पिंपरी | देहूरोडमध्ये महाविकासआघाडीचे निषेध आंदोलन
Updated On:

देहूरोड, (वार्ताहर) – खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात आक्षेपार्ह टीका करणारे आमदार संजय गायकवाड, खासदार अनिल बोंडे तसेच केंद्रीय मंत्री रवणीत सिंह बिट्टू यांच्या निषेधार्थ देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले.
यावेळी लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांची हत्या करण्याची, त्यांची जीभ कापण्याची, त्यांच्या जीविताला धोका निर्माण करण्याच्या धमक्या देणाऱ्या महायुतीतील मित्र पक्षांतील नेत्यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली.
तसेच किवळे गाव कामगार तलाठी रवी मोहरुत, सहाय्यक पोलीस निरीक्षक जोयफ शेख यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.





