Maharashtra politics| राज्य विधिमंडळाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी थेट बनियन-टॉवेलवर आंदोलन केले. यावेळी एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांवर विरोधकांनी निशाणा साधला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, जितेंद्र आव्हाड, भास्कर जाधव, सतेज पाटील, सचिन अहिर, महेश सावंत आदी नेत्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. तर संजय गायकवाड यांचा बॉक्सिंग अवतारमधील फोटो असलेल्या बॅनरवर ‘महाराष्ट्राची लूट करणाऱ्या चड्डी बनियनचा धिक्कार असो’, असा उल्लेख करण्यात आला. ‘महाराष्ट्राची सुरू लूट, चड्डी बनियन गँगला सूट’, ‘खोक्यांची वाढलीय मस्ती, चड्डी बनियन गँगची पहा कुस्ती’ असेही फलक विरोधकांच्या हातात होते. Maharashtra politics| शिंदे यांच्या दोन ‘संजय’ची चर्चा दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासातील कँटिनमधील जेवणाच्या दर्जावरून कँटिन कर्मचार्यांना मारहाण केली. त्यावेळी संजय गायकवाड हे टॉवेल आणि बनियानवर आले होते. त्यानंतर राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांचाही पैशाची बॅग असलेला व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओत संजय शिरसाट हे बनियावर दिसून आले होते. Maharashtra politics| हेही वाचा : ओडिशा विधानसभेबाहेर गोंधळ ! विद्यार्थिनीच्या मृत्यूनंतर लोक रस्त्यावर ; पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या