‘श्रीगणेश विसर्जनानंतर महाविकास आघाडी सरकारचेही विसर्जन’

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पार्थ पवार यांना सार्वजनिकरित्या फटकारल्यानंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे. अशातच रिपाईचे रामदास आठवले यांनी एक भाकीत वर्तविले आहे.

रामदास आठवले म्हणाले कि, पार्थ पवार यांच्याबाबत शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज होतील. यामुळे तिन्ही पक्षांमध्ये अंतर्गत वाद आणि बंडाळी होऊन महाविकास आघाडी सरकारच्या भवितव्यावर परिणाम होतील. यंदाच्या वर्षी श्रीगणेश विसर्जनानंतर महाविकास आघाडी सरकारचेही विसर्जन होईल आणि पुन्हा महायुतीचे सरकार स्थापित होतील, असे भाकीत त्यांनी केले.

दरम्यान, पार्थ प्रकरणावर चर्चा करण्यासाठी शरद पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक झाली आहे. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली हे समजू शकलेले नाही

Leave A Reply

Your email address will not be published.