पिरंगुट – सत्तेचा वापर हा जनतेच्या सेवेसाठी झाला पाहिजे. महाविकास आघाडीची सत्ता आली आणि करोना आला. कोव्हिड काळात सत्ता आल्याने जनतेची सेवा करण्याची एक प्रकारे संधी मिळाली आहे. पक्षाच्या माध्यमातून नवीन सदस्यांसाठी प्रशिक्षण शिबीर घेतले जाईल, असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.
भूगाव (ता. मुळशी) येथे मुळशी तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने कार्यकर्ता मेळावा आणि नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता, यावेळी खासदार सुप्रिया सुळे बोलत होत्या.
सुळे यांच्या हस्ते अमित कंधारे, सौ. रायरीकर व नवीन सदस्यांचा सन्मानचिन्ह आणि पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपचे कार्यकर्ते व कोंढवळेचे माजी उपसरपंच लहू चव्हाण, तसेच इतर कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.
यावेळी रणजित शिवतरे, प्रदीप गारटकर, सचिन घोटकुले, रामभाऊ ठोंबरे, राजाभाऊ हगवणे, सविता दगडे, पांडुरंग ओझरकर, विजय केदारी, शंकर मांडेकर, अंजली कांबळे, महादेव कोंढरे, कोमल वाशिवले, राधिका कोंढरे, वैशाली गोपालघरे, अमित कंधारे, दिलीप दगडे, सुनील चांदेरे, अंकुश उभे, अंकुश मोरे, नीलेश पाडाळे, निखिल मारणे, भाऊ केदारी, दगडुकाका करंजावणे, प्रशांत रानवडे, सतीश सुतार, जितेंद्र इंगवले, विलास अमराळे, साईदास शिंदे, तसेच विविध सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, कोंढरेच्या नेतृत्वाखाली तालुक्यात संघटना वाढली. या रस्त्यासंदर्भात चर्चा झाली असून हे काम संथ गतीने सुरू आहे. निधीची कमतरता असल्याने काम हळू होत आहे.
पुढील वर्षाभरात रस्त्याचे काम मार्गी लागेल. रणजित शिवतरे म्हणाले, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नवीन सदस्यांना तालुकास्तरावर प्रशिक्षण शिबीर घेतले जाईल.
सूत्रसंचालन प्रा. संतोष गावडे यांनी केले. प्रास्ताविक महादेव कोंढरे यांनी केले, तर अंकुश मोरे यांनी आभार मानले.