मुंबई – आयएनएस विक्रांत घोटाळ्यात गोळा केलेले कोट्यवधी रुपये किरीट सोमय्या यांनी पीएमसी बॅंकेच्या माध्यमातून “व्हाइट’ केल्याचा खळबळजनक आरोप खासदार संजय राऊत यांनी केला. देशभरात किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांच्याविरोधात गुन्हे केले जातील, असंही ते ईडीच्या कारवाईनंतर मुंबईत पत्रकरांशी बोलतांना म्हणाले होते. काय आहे संजय राऊत यांची फेसबुक पोस्ट यानंतर आज त्यांनी फेसबूकवर पोस्ट करत किरीट सोमय्यांवर टीका केली आहे. त्यांनी ‘महात्मा सोमय्या इधर उधर की बात मत कर. सिर्फ येही बता..save vikrant के लिये जमा किया गया पैसा किधर…गया .मुद्दा तो यही हैं ना… देश के नाम पर आपने चोरी की है या नही? नौटंकी बंद करो.. आंकडे का खेल बाद में खेलेंगे. it’s the matter of police investigation.समझा क्या..?’ असं म्हणत त्यांनी सोमय्यांवर टीका केली आहे. संजय राऊत म्हणाले होते की, आयएनएस विक्रांतच्या निधीत राष्ट्रभक्तीच्या नावावर कोट्यवधी रुपये गोळा केले आणि पीएमसी बॅंकेच्या माध्यमातून किरीट सोमय्यानी ते व्हाइट केले. सोमय्यांच्या घोटाळ्यावर आज राज्यसभेचं कामकाज स्थगित झालं, भाजपचे खासदारसुद्धा यावर बोलू शकले नाही. देशाच्या कानाकोपऱ्यात किरीट सोमय्या आणि त्यांच्या मुलाच्या विरोधात गुन्हे दाखल केले जातील. तुम्ही तुमची कबर ही महाराष्ट्रात खोदली आहे, आता ही कबर देशातही खोदली जाईल, असं संजय राऊत भाजपला उद्देशून म्हणाले. सोमय्या त्यांच्या आरोपावर उत्तर देत नाहीत याचा अर्थ त्यांनी भ्रष्टाचार केल्याचं स्पष्ट आहे, असंही ते म्हणाले.