महात्मा गांधी जयंती : चंद्रकांत पाटलांनी केली गांधी खादी भंडारमधून कपड्यांची खरेदी

Updated On:

पुणे – भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून कर्वे रोडवरील गांधी खादी भंडार येथून खादीच्या कपड्यांची खरेदी केली. या खरेदीतून त्यांनी स्वदेशीचा नारा दिला.

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी ‘डिजीटल प्रभात’शी संवाद साधला. ते म्हणाले की, मी नेहमीच खादीचे शर्ट वापरतो. फक्त गांधी जयंती आहे, म्हणूनच खरेदी करतोय, असं काही नाही. पण प्रत्येक गोष्टीला एक प्रासंगीक चालना द्यायला हवी. त्यामुळे भाजपने संपूर्ण देशभरात गांधी जयंती निमित्ताने खादी ग्राम उद्योगांच्या दुकातून खरेदी करा, वापरा आणि इतरांना भेट द्या असं ठरवलंय.

यापूर्वी खादी म्हटलं की, जुन्या काँग्रेसवाल्यांनीच वापरायचं असा समज होता. मात्र याच खादीच्या माध्यमातून उद्योगांना चालना मिळणार असल्याचं पाटील यांनी नमूद केलं.
जगातील 182 देशांपैकी 162 देश विकसनशील देश आहेत. हे मोठं मार्केट आहे. या 162 देशांमध्ये आपलं प्रोडक्ट विकल्यास आपली अर्थव्यवस्था वाढेल, असा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आग्रह आहे. यातून कुटीर उद्योगांना चालना मिळणार असल्याचं पाटील यांनी म्हटलं.

यावेळी त्यांनी गांधी जयंती निमित्त आपलं पुणे शहर स्वच्छ ठेवण्याचं आवाहन केलं. तसेच 100 टक्के स्वदेशीच वापरा असा सल्लाही त्यांनी पुणेकरांना दिला.

आणखी संबंधित बातम्या

Pune politics : भाजपची सुनेत्रा पवारांकडे तक्रार; अमोल बालवडकरांच्या भूमिकेवर गणेश बिडकरांचा आक्षेप

2026-08-20 21:51:33

Pune politics : भाजपची सुनेत्रा पवारांकडे तक्रार; अमोल बालवडकरांच्या भूमिकेवर गणेश बिडकरांचा आक्षेप

Education Scheme : मोठी बातमी ! उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना दरमहा 2 हजार रुपये पॉकेटमनी? राज्य सरकारचा प्रस्ताव चर्चेत

2026-08-20 17:16:33

Education Scheme : मोठी बातमी ! उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना दरमहा 2 हजार रुपये पॉकेटमनी? राज्य सरकारचा प्रस्ताव चर्चेत

Governor Jishnu Dev Varma: विद्यार्थ्यांनी रोजगार न शोधता उद्योजक व्हावे! राज्यपाल जिष्णु देव वर्मांचे आवाहन

2026-08-17 05:45:21

Governor Jishnu Dev Varma: विद्यार्थ्यांनी रोजगार न शोधता उद्योजक व्हावे! राज्यपाल जिष्णु देव वर्मांचे आवाहन

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेसह राष्ट्रवादीला भाजपचा दे धक्का; पुण्यातील 3 बड्या नेत्यांचा पक्षप्रवेश; राजकीय वर्तुळात खळबळ

2026-08-16 15:37:58

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेसह राष्ट्रवादीला भाजपचा दे धक्का; पुण्यातील 3 बड्या नेत्यांचा पक्षप्रवेश; राजकीय वर्तुळात खळबळ

Chandrakant Patil: कौशल्य शिक्षणानेच समृद्ध भारताचे स्वप्न साकार; मंत्री चंद्रकांत पाटील याचे प्रतिपादन

2026-08-14 05:15:07

Chandrakant Patil: कौशल्य शिक्षणानेच समृद्ध भारताचे स्वप्न साकार; मंत्री चंद्रकांत पाटील याचे प्रतिपादन