Abhijeet Bhattacharya | प्रसिद्ध बॉलिवूड गायक अभिजीत भट्टाचार्य त्यांच्या गाण्यांसाठी ओळखले जातात. शाहरुखचा आवाज म्हणून प्रसिद्ध असलेले अभिजीत त्यांच्या गाण्यांव्यतिरिक्त वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतात. यावेळी अभिजीत यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ज्यावरून त्यांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जात आहे. संगीतकार आरडी बर्मन हे महात्मा गांधी यांच्यापेक्षाही मोठे होते, इतकंच नाही तर महात्मा गांधी हे भारत नाही तर पाकिस्तानचे राष्ट्रपिता होते असंही ते म्हणाले आहेत. शुभंकर मिश्रासोबतच्या एका पॉडकास्टमध्ये महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त विधान करून अभिजीत नेटकऱ्यांच्या रडारवर आले आहेत. या मुलाखतीत अभिजीत भट्टाचार्य म्हणाले की, “संगीतकार आरडी बर्मन हे महात्मा गांधींपेक्षा मोठे होते. महात्मा गांधी जसे राष्ट्रपिता होते, त्याचप्रमाणे आरडी बर्मन हे संगीत जगतात राष्ट्रपिता होते.” Abhijeet Bhattacharya | पुढे अभिजीत म्हणाले, “महात्मा गांधी हे भारताचे नव्हे तर पाकिस्तानचे राष्ट्रपिता होते. भारत आधीपासून अस्तित्वात होता, पाकिस्तान नंतर भारतापासून वेगळा झाला. गांधींना चुकून भारताचे राष्ट्रपिता म्हटले गेले. पाकिस्तानच्या अस्तित्वामागे तेच जबाबदार आहेत.” Abhijeet Bhattacharya | अभिजीत भट्टाचार्य ट्रोल अभिजीत यांच्या या वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. अभिजीतच्या या वक्तव्यावर अनेक यूजर्स संतापले. एकाने लिहिले की, ‘ते राष्ट्रपिता होते की नाही हे ठरवणारे तुम्ही कोण?’ दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘त्यांच्याकडून चांगल्या विधानांची अपेक्षा नाही. खुर्चीवर बसून हे लोक फालतू विधानं करत असतात.’ सध्या अभिजीत यांच्यावर अनेकांकडून टीका केली जात आहे. हेही वाचा : उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एन्काउंटर! खलिस्तानी कमांडो फोर्सचे ३ दहशतवादी ठार ; २ एके-47 जप्त