satara | महाबळेश्वरात महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात

महाबळेश्वर, (प्रतिनिधी) – येथील वीरशैव लिंगायत तिराळी समाज मंडळाच्या वतीने श्री महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. जगत ज्योती महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त लिंगायत समाजाने अक्षयतृतीयानिमित्त विविध कार्यक्रमांचे नियोजन केले होते.
सकाळी श्री राम मंदिर येथे महात्मा बसवेश्वरांच्या अर्धपुतळ्याची पुजा करुन जगत ज्योती महात्मा बसवेश्वर चौकामध्ये प्रशासक तथा मुख्याधिकारी योगेश पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आला. त्यानंतर नगरपालिकेत जाऊन पालिकेतील महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेची पूजा करण्यात आली.
यावेळी प्रशासक तथा मुख्याधिकारी पाटील यांनी महात्मा बसवेश्वर चौकाचे सुशोभीकरण लवकरात लवकर पूर्ण करू, असे आश्वासन दिले. यावेळी समाजातील अडी अडचणींबाबत प्रा.गणेश कोरे यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात चर्चा केली. आभार अध्यक्ष प्रसाद शिपटे यांनी मानले.
सायंकाळी जगत ज्योती महात्मा बसवेश्वर चौकातून मिरवणूकीला प्रारंभ करण्यात आला. मिरवणूकीसाठी महिलांचा व तरुणांचा सहभाग लक्षवेधी होता. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाबळेश्वर विरशैव लिंगायत तिराळी समाजाचे अध्यक्ष प्रसाद शिपटे, उपाध्यक्ष प्रा. गणेश कोरे, ज्येष्ठ उद्योगपती दिलीप पाटील,
ॲड. संजय जंगम, माजी नगरसेवक रविंद्र कुंभारदरे, प्रकाश पाटील, राजेश कुंभारदरे, मिलींद खुरासणे, उमेश खुरासणे, राजेंद्र धोत्रे, संकेत धोत्रे, सचिन धोत्रे, रवी केंडे, उमेश शिपटे, नितीन परदेशी, सचिन कुंभारदरे, सचिन उगले, सनी उगले आदींनी परिश्रम घेतले.
यावेळी हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक म्हणून माजी उपनगराध्यक्ष अफझल सुतार, दि महाबळेश्वर अर्बन को. ऑप बॅंकेचे नुतन अध्यक्ष सmiर सुतार, तौफिक पटवेकर यांनी देखील मिरवणूकीत सहभाग घेतल्याने शहरातून एक सकारात्मक वेगळा संदेश पोहोचला.
शिंपी समाजाचे अमित माळवदे, मारवाडी समाजाचे प्रतिनिधी विशाल तोष्णिवाल, प्रविण भांगडीया यांच्यासह ओ.बी.सी संघटनेचे अध्यक्ष अनिल लोहार, संदीप देवकुळे यांनी मिरवणूकीत सहभाग घेतल्याने चैतन्य निर्माण झाले होते.





