महाशक्तीची १०० जागांची पहिली यादी जाहीर होणार; बच्चू कडूंनी दिली माहिती

Bachu Kadu | विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी असा थेट सामना रंगणार आहे. सोबतच प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून लढा देणार आहेत. नुकतेच त्यांनी परिवर्तन महाशक्तीची उमेदवार यादीबाबत भाष्य केले आहे.
“माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी, स्वराज्य पक्षाचे संभाजीराजे छत्रपती आज बैठक घेणार आहोत. ज्या आमच्या मजबूत जागा आहेत ती यादी आम्ही आज किंवा उद्या जाहीर करू. जवळपास 100 लोकांची सगळी यादी असेल. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये काय बिघाडी होते यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत. मग कोणतेही मोठा नेते असले तर त्या विरोधात आम्ही उमेदवार देणार, आम्हाला कसली भीती? बच्चू कडू कधीही भित नाही,” असे बच्चू कडू यांनी म्हंटले आहे. Bachu Kadu |
पुढे ते म्हणाले, “भाजप आपल्याच उमेदवाराला बकरा करू लागला अशी सध्या स्थिती आहे. अमरावती जिल्ह्यात भाजपा ठेवायचीच नाही अशी राणा कुटुंबाने व्यवस्था केली आहे. प्रवीण तायडे हा नवा कार्यकर्ता आहे. अनेक गुन्हे दाखल झालेले जुने कार्यकर्त्यांना डावलून नव्या कार्यकर्त्याला तिकीट दिले आहे. केंद्रात सत्ता असताना नवखे कार्यकर्ते देणे ही भाजपची हार आहे,” अशी भाजपवर बच्चू कडू यांनी टीका केली. Bachu Kadu |
सध्याचे राजकारण म्हणजे कार्यकर्त्यांची किंमत लोकांना आणि पक्षांना कोणालाच राहिले नाही. फार निवडक ठिकाणी कार्यकर्त्याचं काम ओळखून उमेदवारी दिली जाते. अशी खंतही बच्चू कडू यांनी बोलून दाखवली आहे. विदर्भातील रामटेक, चंद्रपूरमधील वरोरा, आर्वीसह 3-4 महत्त्वाच्या जागा आहे, तेथे चांगले उमेदवार मिळाल्यावर त्यांची नावे जाहीर करणार असल्याचेही बच्चू कडू म्हणाले.





