Savi Mudrale : महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली! कोकणकन्या सावी मुद्राळेचा दिल्लीत होणार सत्कार, कारण…
Savi Mudrale : सोशल मीडियावरील इंन्स्टाग्रामवर लहान मुलांचे रील्स मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असतात.

Savi Mudrale : सोशल मीडियावरील इंन्स्टाग्रामवर लहान मुलांचे रील मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असतात. व्हायरल होणारे रील करणूक करणारे असतात तर काही रीलमधून माहिती देखील मिळत असते. कोकणकन्या नावाने लोकप्रिय असलेली सावी मुद्राळे हिला सोशल मीडियामुळेच लोकप्रियता मिळाली.
तिचे रील मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असतात. नुकतेच केंद्र सरकारच्या ‘प्रोजेक्ट वीर गाथा ५.०’ या शालेय उपक्रमात तिची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या उपक्रमासाठी देशभरातील तब्बल २ कोटी विद्यार्थ्यांमधून निवड झालेल्या केवळ १०० विजेत्यांमधून पहिल्या १० क्रमांकांमध्ये सावी मुद्राळे हिची निवड करण्यात आली आहे. ही खरचं महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब असून, तिचा गौरव दिल्लीत केला जाणार असल्याने महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली आहे.
हेही वाचा : Vikas Gogavele : मोठी बातमी! अखेर भरत गोगावलेंचे पुत्र पोलिसांना शरण; कोर्टाच्या सुनावणीकडे लक्ष
येत्या २६ जानेवारी २०२६ रोजी दिल्ली येथे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते सावी मुद्राळेचा सत्कार होणार आहे. तसेच लाल किल्ल्यावरून प्रजासत्ताक दिनाची ऐतिहासिक परेड पाहण्यासाठी ‘विशेष अतिथी’ म्हणूनही तिला आमंत्रित करण्यात आले आहे. याबाबतची माहिती मंत्री नितेश राणे ( Nitesh Rane) यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली आहे.
कोण आहे कोकणकन्या सावी मुद्राळे?
कोकणकन्या नावाने सावी मुद्राळे ओळखली जाते. इन्स्टाग्रामवर तिचे हजारो फॉलोअर्स असून ती कोकणची संस्कृती आणि जीवनशैली दाखवणारी रील शेअर करते असते.
कणकवलीच्या लेकीचा राजधानी दिल्लीत सत्कार!
केंद्र सरकारच्या ‘प्रोजेक्ट वीर गाथा 5.0’ या अत्यंत प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय शालेय उपक्रमात देशभरातील तब्बल २ कोटी विद्यार्थ्यांमधून निवड झालेल्या केवळ १०० विजेत्यांमधून पहिल्या १० क्रमांकांमध्ये कणकवलीची कोकणकन्या सावी मुद्राळे हिचं नाव… pic.twitter.com/QZqVIWhdsR
— Nitesh Rane (@NiteshNRane) January 22, 2026
काय आहे प्रोजेक्ट वीर गाथा ५.० ?
प्रोजेक्ट वीर गाथा ५.० हे रक्षा मंत्रालय आणि शिक्षण मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने MyGov प्लॅटफॉर्मवर चालवले जाणारे एक राष्ट्रीय उपक्रम आहे. हा प्रकल्प २०२१ पासून सुरू झाला असून, त्याचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करणे, गॅलंट्री अवॉर्ड प्राप्त सैनिकांच्या शौर्यगाथा आणि बलिदानाची कथा पोहोचवणे आणि नागरिकत्वाच्या मूल्यांचे महत्त्व शिकवणे हा आहे.






