Maharashtra Weather । Heat wave – महाराष्ट्रातील ठाणे, रायगड जिल्हे आणि मुंबईच्या काही भागांत २७ ते २९ एप्रिल दरम्यान उष्णतेच्या लाटेचा इशारा भारतीय हवामान विभागाने जारी केला आहे. आयएमडीच्या शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी बुधवारी सांगितले की, ठाणे, रायगड आणि मुंबईच्या काही भागांवर चक्रीवादळविरोधी वातावरण कार्यरत आहे ज्यामुळे तापमानात वाढ होईल. । Maharashtra Weather । Heat wave २७ आणि २८ एप्रिल रोजी तापमानात कमालीची वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबई आणि आजूबाजूच्या प्रदेशासाठी या महिन्यातील हा दुसरा उष्णतेच्या लाटेचा इशारा आहे. या आधी १५ आणि १६ एप्रिल रोजी नवी मुंबई परिसरातील तापमान ४१ अंशांपर्यंत गेलेले होते. लोकांनी दीर्घकाळ उन्हाशी संपर्क टाळावा, पुरेसे पाणी प्यावे, हायड्रेटेड राहावे, हलक्या रंगाचे, सैल आणि सुती कपडे घालावेत, डोके झाकून घ्यावे किंवा दुपारच्या वेळी बाहेर पडताना ओले कापड किंवा टोपी वापरावी तसेच शक्य असेल तिथे कुलरचा वापर करावा असे आवाहन हवामान विभागाने नागरीकांना केले आहे.