उत्तरेत थंडीची लाट ! महाराष्ट्र गारठला, येत्या दोन दिवसात आणखी पारा घसरणार

Maharashtra Weather । गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडी पूर्णपणे गायब झाली होती. पण कालपासून राज्यात पुन्हा एकदा थंडीची चाहूल लागली आहे. देशात उत्तरेकडील राज्यात थंड वारे वाहत असल्याने राज्यात आता चांगलाच गारठा जाणवत आहे. उत्तर महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढला असून नागरिक रस्त्यावर ठिकठिकाणी शेकोट्या पेटवत आहेत. दरम्यान, येत्या दोन दिवसात तापमान आत आणखी घट होणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तरेकडील राज्यांमध्ये 10 डिसेंबर ते 14 डिसेंबर पर्यंत थंडीची लाट राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये थंडीची लाट राहणार असून कोरडे थंड वारे राज्याच्या दिशेने वाहणार आहेत. परिणामी उत्तर व पश्चिम महाराष्ट्र चांगलाच गारठला आहे.
राज्यात येत्या दोन दिवसात तापमान घटणार Maharashtra Weather ।
राज्यात येत्या दोन दिवसात किमान तापमानात कमालीची घसरण होणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे. उत्तर व पश्चिम महाराष्ट्रात येत्या दोन दिवसात दोन ते चार अंश सेल्सिअसने तापमानात घट होण्याची शक्यता आहे. तर इतर ठिकाणीही हळूहळू तापमान घसरणार असल्याचे हवामान विभागाने वर्तवले.
जळगावात निचांकी तापमानाची नोंद
उत्तर महाराष्ट्र सध्या चांगला गारठलाय . किमान तापमानात कमालीची घट झाली. जळगावात नीचांकी 8 अंशांची नोंद करण्यात आली. तर कमाल तापमान रत्नागिरीत सर्वाधिक 34.5 अंश होते उत्तरेकडील शीत लहरी महाराष्ट्रच्या दिशेन येत असल्याने नाशिकमधे कडाक्याची थंडी पडली आहे. शहरासह ग्रामीण भागातील तपमानात घट झाल्यान नाशिककर गारठले आहे. निफडमध्ये आज 8.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. सोमवारच्या तुलनेत पार दोन अंशांनी वाढला असला तरीही गारवा कायम दिसत आहे.
मुंबईत गारठा वाढला Maharashtra Weather ।
उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळ मुंबईत तापमान घसरले आहे. सोमवारी मुंबईत महाबळेश्वर पेक्षाही कमी तापमानचा पारा होता. सोमवारी 13.7 अंशांवर असलेला तापमानाचा पारा आज वर चढला आहे. पण थंडीचा जोर कमी झाला नाही. पुढील 5 दिवस हे राज्यात थंडीचे असणार आहेत. आज मुंबईत किमान तापमान हे 23 अंशांपर्यंत जाणार आहे. तर कमाल तापमान 28 अंशांपर्यंत जाण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
हेही वाचा
सीरियातून 75 भारतीय नागरिकांना काढले बाहेर ; लेबनॉनमार्गे मायदेशी परतणार





