Maharashtra Weather। महाराष्ट्राच्या अनेक भागात हवामानात बदल होताना दिसत आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) सांगितले की, “महाराष्ट्रातील अनेक भागात थंडीची लाट सुरू आहे. राज्यात काही ठिकाणी किमान तापमानात एक अंशाची घसरण झाली आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती याठिकाणी ७.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. एका वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार,”पुणे आणि नाशिक जिल्ह्यात किमान तापमान ८ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. IMD नुसार जळगावात पारा 8.3 अंश सेल्सिअसपर्यंत घसरला, तर परभणी, छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव येथे किमान तापमान अनुक्रमे 9.4, 10 आणि 10.2 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. मुंबई आणि नाशिकचे किमान तापमान किती होते? Maharashtra Weather। नाशिक जिल्ह्यातील मालेगाव याठिकाणी ९.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. राज्याची राजधानी मुंबईत, सांताक्रूझ वेधशाळेने किमान तापमान 15 अंश सेल्सिअस नोंदवले, तर कुलाबा आयएमडी (दक्षिण मुंबईत) तापमान 20 अंश सेल्सिअस असल्याचे सांगितले. आयएमडीच्या म्हणण्यानुसार पुढील काही दिवसांमध्ये पारा हळूहळू वाढेल. लातूर गावातील शेतात दवाची पांढरी चादर Maharashtra Weather। लातूरच्या नकुलेश्वर बोरगाव गावातील एका ऊस उत्पादक शेतकऱ्याला बर्फाची चादर पाहून धक्काच बसला, ही घटना मध्य महाराष्ट्रातील या कोरड्या जिल्ह्यात फारच दुर्मिळ आहे. शेतकरी विठ्ठल साळुंके हे सोमवारी सकाळी त्यांच्या उसाच्या शेतात गेले असता त्यांना संपूर्ण जमीन पांढऱ्या चादरीने झाकलेली दिसली कारण हिवाळ्यातील थंडीमुळे दव बर्फात बदलले होते. शेतकऱ्याने सांगितले की, क्षणभर त्याला वाटले की, आपण काश्मीरमध्ये आहोत. त्यांनी सांगितले की त्यांनी ताबडतोब त्यांच्या मोबाईल फोनवर स्थानिक तापमान तपासले आणि तापमान 6 अंश सेल्सिअस असल्याचे आढळले. त्याबद्दल बोलताना ते म्हणाले, “मी 30 वर्षांपासून शेती करत आहे, पण माझ्या दोन एकर शेतात गोठलेले दव मी पहिल्यांदाच पाहिलं आहे. IMD मुंबईच्या शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी सांगितले की, ‘पूर्वेकडील वाऱ्यांमुळे पुढील तीन ते चार दिवसांत किमान तापमानात हळूहळू वाढ होईल, ज्यामुळे ओलावा येईल.’