महाराष्ट्र विधानसभा: उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे संभाव्य उमेदवार ठरले; पहा यादी

Maharashtra Assembly Election 2024 : आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी सर्व पक्षांमध्ये जागावाटपाची चर्चा सुरु आहे, अशातच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे मुंबईतील संभाव्य उमेदवार ठरले आहेत. मुंबईतील संभाव्य उमेदवारांची यादी समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून वेळोवेळी सांगितले जाते की मुंबई हा त्यांचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे मुंबईत महाविकास आघाडीतील तीन्ही पक्षांमध्ये ठाकरे गटाला जास्त जागा मिळणार आहेत.
महाविकास आघाडी लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही एकत्रच निवडणुक लढवणार आहे. अजून जागावाटप निश्चित झाले नसले तरी, सर्व पक्ष आपआपली संभाव्य यादी तयार करत आहे. शिवसेनेनेही यादी तयारी केल्याची माहिती समोर येत आहे. कोणा कोणाचा या यादीत समावेश आहे हे जाणून घेऊया. (Maharashtra Assembly Election 2024)
दरम्यान, मुंबईत विधानसभेच्या 36 जागा आहेत. यापैकी 14 जागा ठाकरेंनी जिंकल्या होत्या. शिवसेनेने मागील निवडणुकीत एकूण 56 जागांवर विजय मिळवला होता. मात्र आता पक्ष फुटीनंतर आमदार हे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत विभागले गेले आहेत.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे मुंबईतील संभाव्य उमदेवार –
1. विलास पोतनीस / सुदेश पाटेकर/ संजना घाडी : मागाठणे
2. विनोद घोसाळकर : दहिसर
3. सुनिल प्रभू : दिंडोशी
4. अमोल किर्तीकर/ बाळा नर/ शैलेश परब : जोगेश्वरी
5. ऋतुजा लटके : अंधेरी पश्चिम
6. राजू पेडणेकर/ राजूल पटेल : वर्सोवा
7. वरूण सरदेसाई : वांद्रे पूर्व
8. विशाखा राऊत/ महेश सावंत : दादर-माहिम
9. अजय चौधरी/ सुधीर साळवी : शिवडी
10. आदित्य ठाकरे : वरळी
11. किशोरी पेडणेकर/ जामसूतकर/ रमाकांत रहाटे : भायखळा
12. ईश्वर तायडे : चांदीवली
13. अनिल पाटणकर/ प्रकाश फार्तेपेकर : चेंबुर
14. रमेश कोरगांवकर : भांडुप
15. सुनिल राऊत : विक्रोळी
16. संजय पोतनीस : कलिना
17. विठ्ठल लोकरे / प्रमोद शिंदे : अणुशक्तीनगर
18. सुरेश पाटील : घाटकोपर
19. प्रविणा मोरजकर : कुर्ला
20. निरव बारोट : चारकोप
21. समीर देसाई : गोरेगाव
22. श्रद्धा जाधव : वडाळा
मुंबईसाठी खास प्लॅनिंग –
यावेळी महाविकास आघाडी एकत्र लढत असल्यामुळे मुंबईत काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत काही जागांची आदला बदली शक्य असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत वरिष्ठांसोबत होणाऱ्या बैठकीत निर्णय होईल, असेही सांगण्यात आलेय. ज्या लोकसभा मतदारसंघात विधानसभा क्षेत्रात लीड मिळालं, त्या जागांसाठी ठाकरेंचा आग्रह असल्याचीही माहिती मिळत आहे.
मागील निवडणुकीत ज्या जागांवर ठाकरेंचे उमेदवार दुसऱ्या स्थानावर होते, जिथे सध्या विरोधी पक्षाचा आमदार आहे, अशा जागांसाठीही आग्रह असल्याची माहिती मिळत आहे. 2019 मध्ये मुंबईत काँग्रेसचे केवळ चार तर राष्ट्रवादीने केवळ एक जागा जिंकली होती. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत ठाकरेंनी चारपैकी तीन जागांवर विजय मिळवला. आता या 36 जागा असलेल्या मुंबईत उद्धव ठाकरे यांचे उमेदवार निवडणुक लढवणार असल्याचा निर्णय जवळपास निश्चित झाल्याचेही बोलले जात आहे.





