मोठी बातमी : 10 वी, 12 वीच्या परीक्षेची तारीख जाहीर; शिक्षण मंत्र्यांची घोषणा

Updated On:
मोठी बातमी : 10 वी, 12 वीच्या परीक्षेची तारीख जाहीर; शिक्षण मंत्र्यांची घोषणा

मुंबई – दहावी, बारावीच्या परीक्षांची तारीख जाहीर करण्यात आली आहे. इयत्ता बारावीची परीक्षा 23 एप्रिल ते 29 मे 2021 या दरम्यान घेतली जाणार असून इयत्ता दहावीची परीक्षा 29 एप्रिल ते 31 मे 2021 दरम्यान घेतली जाणार आहे, अशी माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

दहावीच्या परीक्षांचा निकाल जुलैच्या अखेरीस तर बारावीच्या परीक्षांचा निकाल हा ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस जाहीर केला जाणार असल्याचेही वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.

गेल्या वर्षभरापासून देशासह राज्यात करोनाचा धुमाकूळ सुरू आहे. त्यामुळे यंदाच्या दहावी, बारावीच्या परीक्षांचं काय होणार असा प्रश्न विद्यार्थ्यांसह पालकांना पडला होता. मात्र, अखेर आज वर्षा गायकवाड यांनी परीक्षांचा कालावधी जाहीर करून राज्यातील विद्यार्थ्यांसह पालकांना मोठा दिलासा दिला आहे.

करोनाचा काळ लक्षात घेता यंदाच्या परीक्षा नेमक्या कशा घेतल्या जाणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेणे कठीण असल्याचं मत शिक्षण मंत्र्यांनी व्यक्त केलं होतं. त्यामुळे या परीक्षा विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावरच जाऊन द्याव्या लागण्याची शक्यता आहे.

आणखी संबंधित बातम्या

Vishwakarma University : एआयच्या कल्पनांना मिळाले व्यासपीठ! विश्वकर्मा विद्यापीठात IBM SkillsBuild हॅकॅथॉनची प्रादेशिक अंतिम फेरी

2026-09-30 19:29:24

Vishwakarma University : एआयच्या कल्पनांना मिळाले व्यासपीठ! विश्वकर्मा विद्यापीठात IBM SkillsBuild हॅकॅथॉनची प्रादेशिक अंतिम फेरी

Prof. Dr. Mangesh Karad : प्रा. डॉ. मंगेश कराड ‘मराठवाडा रत्न’ पुरस्काराने सन्मानित; शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल

2026-09-28 15:14:45

Prof. Dr. Mangesh Karad : प्रा. डॉ. मंगेश कराड ‘मराठवाडा रत्न’ पुरस्काराने सन्मानित; शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल

अग्रलेख : शैक्षणिक अस्वस्थता

2026-09-23 06:00:46

अग्रलेख : शैक्षणिक अस्वस्थता

Teacher Award : रामचंद्र अय्यर यांना तालुकास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार

2026-09-22 21:40:21

Teacher Award : रामचंद्र अय्यर यांना तालुकास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार

Supreme Court : शिक्षणाच्या नावाखाली नफा कमावणारे अडचणीत; सर्वोच्च न्यायालयाची खासगी विद्यापीठांवर कारवाई

2026-09-22 17:20:15

Supreme Court : शिक्षणाच्या नावाखाली नफा कमावणारे अडचणीत; सर्वोच्च न्यायालयाची खासगी विद्यापीठांवर कारवाई