पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदा दहावीचा निकाल 99.95 टक्के एवढा लागला आहे. मागील वर्षा पेक्षा यंदाच्या निकालात 4.65 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मुलांपेक्षा मुलींना निकालात बाजी मारली आहे. राज्यात कोकण विभागाचा सर्वाधिक 100 टक्के तर सर्वात कमी नागपूर विभागाचा 99.84 टक्के एवढा आहे. दहावीची परीक्षा 29 एप्रिल 20 मे या कालावधीत घेण्यात येणार होती. या परीक्षेसाठी राज्यातील 16 लाख 58 हजार 624 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. त्यात 9 लाख 9 हजार 931 मुले तर 7 लाख 48 हजार 693 मुलींचा समावेश होता. मात्र करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने 12 मे रोजी घेतला होता. त्यानंतर 28 मे रोजी दहावीच्या निकालाचा मूल्यमापन आराखडा जाहीर करण्यात आला होता. इयत्ता नववीसाठी 50 टक्के व दहावीसाठी 50 टक्के याप्रमाणे 100 टक्के गुणांनुसार अंतर्गत मुल्यमापन करुन निकाल तयार करण्यात आले आहेत. विभागीय मंडळनिहाय टक्केवारीत निकाल – पुणे – 99.96 ,नागपूर- 99.84 , औरंगाबाद- 99.96 , मुंबई- 99.96, कोल्हापूर- 99.92, अमरावती- 99.98 , नाशिक- 99.96, लातूर- 99.96 , कोकण – 100. निकाल – मुले – 99.94 टक्के; मुली – 99.96 टक्के