School news : राज्यातील प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना उन्हाळी सुट्टी जाहीर झाली आहे. 2 मे ते 14 जून पर्यंत राज्य मंडळाच्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच, पुढील शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्य विदर्भ व इतर सर्व विभागातील राज्य मंडळाच्या शाळा 15 जून रोजी सुरु होणार आहे. School news : राज्यातील शाळांना उन्हाळी सुट्टी जाहीर; ‘या’ शाळांना विशेष नियम विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर शाळा 15 जून ते 29 जून पर्यंत सकाळच्या सत्रात सकाळी सात ते 11:45 यावेळेत सुरू ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. School news 30 जून पासून विदर्भातील शाळा सुद्धा नियमित सुरु होतील. राज्यातील इतर मंडळांच्या शाळांचे वेळापत्रक पाहता व त्या शाळांमधील विविध उपक्रम राबवण्यात येत असल्याने सुट्टीबाबत शाळा प्रशासनाने त्यांच्या स्तरावर निर्णय घ्यावा, असे परिपत्रकात सांगण्यात आले आहे. School news