शेतकरी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र पहिला; विदर्भाला सर्वाधिक फटका
Updated On:

मुंबई – महाराष्ट्रात या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत एकूण १,२६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून राज्याच्या विदर्भातील अमरावती विभागात ५५७ मृत्यू झाले आहेत.
जानेवारी-जूनच्या आकडेवारीनुसार, छत्रपती संभाजीनगर विभाग ४३० मृत्यूंसह दुसऱ्या क्रमांकावर आहे, त्यानंतर नाशिक विभागात १३७, नागपूर विभागात १३० आणि पुणे विभागात १३ मृत्यू झाले आहेत. किनारी कोकण विभागात एकही मृत्यू झाला नाही.
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोनुसार, २०२२ मध्ये, देशातील एकूण शेतकरी आत्महत्यांपैकी ३७.६ % या धक्कादायक आकडेवारीसह महाराष्ट्रा आघाडीवर आहे. एनसीआरबीने म्हटले आहे की,५,२०७ शेतकरी किंवा शेती करणारे आणि ६,०८३ शेतमजूर असलेल्या ११,२९० व्यक्तींनी २०२२ मध्ये आपले जीवन संपवले.





