Maharashtra Rain Alert: ‘या’ जिल्ह्यांत पुढील चार तास विजांसह पावसाचा इशारा

Maharashtra Rail Alert: राज्यात परतीचा पाऊस सुरु आहे. गेली दोन दिवसांपासून सर्वत्र जोरदार पाऊस झाला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 28 सप्टेंबरपर्यंत राज्यात विविध ठिकाणी कमी अधिक पाऊस पडणार आहे. हवामान विभागाने आज राज्यातील अनेक भागात जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे. मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती झाली आहे. या क्षेत्राच्या प्रभावामुळे राज्यात 28 सप्टेंबरपर्यंत पावसाची श्यक्यता आहे.
#SatarkAlert #thunderstorms
२६ सप्टेंबर २४; १५:४० (४ तास) Update 2
विजांसह पाऊस. जिल्हे: धुळे, नाशिक, जळगाव, नंदुरबार, नगर, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर | रायगड, रत्नागिरी pic.twitter.com/79hveovHLC— satark (@satarkindia) September 26, 2024
या जिल्ह्यांत विजांसह पावसाचा इशारा –
हवामान विभागानुसार, गोंदिया, भंडारा, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, जालना, छ. संभाजीनगर, धाराशिव, धुळे, नाशिक, जळगाव, नंदूरबार, नगर, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांत पुढील चार तास (8 वाजेपर्यंत) विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
#SatarkAlert #thunderstorms
२६ सप्टेंबर २४; १५:२० (४ तास) Update 1
विजांसह पाऊस. जिल्हे: गोंदिया, भंडारा, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा | नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, जालना, छ. संभाजीनगर, धाराशिव pic.twitter.com/JljltRn9w8— satark (@satarkindia) September 26, 2024
पुढील ४८ तास घाट क्षेत्रात पर्यटन टाळावे –
पालघर, ठाणे, मुंबई आणि उपनगरे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा आदी ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस, तर काही ठिकाणी जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे. नागरिकांनी पुढील ४८ तास घाट क्षेत्रात पर्यटन टाळावे. फ्लॅश फ्लड, दरड कोसळणे, झाडे, भिंती पडणे शक्य असल्याचा सतर्कतेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आल आहे.
#SatarkAlert #HeavyRain
२६ सप्टेंबर २४; ०४:३० (पुढील ६ तास)
◆ मध्यम स्वरूपाचा पाऊस, काही ठिकाणी जोरदार सरी: पालघर, ठाणे, मुंबई आणि उपनगरे, रायगड, रत्नागिरी | घाट क्षेत्र: पुणे, सातारा. ◆ पुढील ४८ तास घाट क्षेत्रात पर्यटन टाळावे. फ्लॅश फ्लड, दरड कोसळणे, झाडे, भिंती पडणे शक्य. pic.twitter.com/byOUk3ppoK— satark (@satarkindia) September 25, 2024





