मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी ) कोरोना व्हायरसमुळे स्थगित केलेल्या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक अखेर जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे राज्यभरातील स्पर्धा परीक्षा उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.
या सुधारित वेळापत्रकानुसार राज्यसेवा पूर्व परीक्षा १३ सप्टेंबर, दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ११ ऑक्टोबर आणि अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा १ नोव्हेंबर होणार आहे. याबाबत एमपीएससीने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर वेळापत्रक प्रसिद्ध केलं आहे.
तसेच कोरोना व्हायरसचा संसर्ग आणि त्यासाठीच्या उपाययोजनांचा फेरआढावा आयोगाकडून मोठा निर्णय घेण्यात येईल, असंही सांगण्यात आलं आहे. त्यानुसार संकेतस्थळावर माहिती जाहीर करण्यात येईल, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे