पुणे – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या दोन परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचे सुधारित वेळापत्रक यथावकाश जाहीर करण्यात येणार असल्याचे आयोगाने म्हटले आहे. त्यामुळे “एमपीएससी’च्या नोव्हेंबर महिन्यातील दोन्ही पूर्व परीक्षा आता लांबणीवर पडल्या आहेत.
मराठा आंदोलकांच्या विरोधानंतर राज्य सरकारने परीक्षेपूर्वी दोन दिवस आधी म्हणजेच दि. 13 ऑक्टोबर रोजी होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.
त्यानंतर आता आणखी दोन परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. त्यामुळे उमेदवारांना आता परीक्षेसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. यासंबंधीचे परिपत्रक आयोगाने मंगळवारी प्रसिद्ध केले.