डोंबिवली : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Maharashtra Politics) सगळेच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. या निवडणुकीच्या तोंडावर अनेक नेते पक्ष बदल करताना दिसत आहेत. आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीमध्ये विविध विकास कामांचे उद्घाटन केले. या उदघाटनानंतर एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंना धक्का देत एका महिला नेत्याला पक्षात स्थान दिले. मंगला सुळे यांचा शिवसेनेत प्रवेश डोंबिवलीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माजी नगरसेविका मंगला सुळे यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. डोंबिवली पश्चिमेत माझी नगरसेवक विकास मात्रे यांच्या शिवसेना संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांसह मंगला सुळे यांनी शिवसेनेत प्रवेश (Maharashtra Politics) केला. मंगला सुळे या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात येण्याआधी भाजपच्या माझी नगरसेविका होत्या. आता त्यांनी शिवसेनेच्या साथीने जनतेची सेवा करण्याचा निर्णय घेतला आहे. हे पण वाचा : “काही लोकांना एवढी पोटदुखी आहे की….”; उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ मागणीवर एकनाथ शिदेंचा शाब्दिक हल्ला आज डोंबिवली MIDC अंतर्गत सावळाराम क्रीडा संकुलाच्या लोकार्पण आणि विकास कामाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत, खासदार श्रीकांत शिंदे, भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.