अमरावती – विधानसभा निवडणुकीत बच्चू कडू यांचा अचलपूर मतदारसंघातून पराभव झाला. रवी राणा आणि नवनीत राणा दाम्पत्यांमुळे बच्चू कडू यांचा पराभव झाला, अशी चर्चा सध्या सुरू आहे. त्यावर बच्चू कडू यांनी उत्तर देत राणा दाम्पत्यांवर निशाणा साधला आहे. माझ्या पराभवाचे श्रेय त्यांनी घेऊ नये. मला पाडण्याची राणा दाम्पत्यांची पात्रता नाही, अशा शब्दांत बच्चू कडू यांनी सुनावले. प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यंदा महाशक्ती परिवर्तन आघाडीकडून विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात होते. अचलपूर मतदारसंघात त्यांचा पराभव झाला, तर दुसरीकडे त्यांचे कट्टर विरोधक रवी राणा हे बडनेरा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. बच्चू कडू म्हणाले, राणा दाम्पत्यांनी माझ्या पराभवाचे श्रेय घेऊ नये. यंदाच्या निवडणुकीत चित्र वेगळे असते, अन् मी पडलो असतो, तर मग माझ्या पराभवाचे श्रेय त्यांना दिले असते. पण, सध्यातरी त्यांनी माझ्या पराभवाचे श्रेय घेऊ नये. त्यांच्यात हिंमत असेल, तर माझ्याविरोधात कुठलीही निवडणूक अपक्ष लढवून दाखवावी, असे आव्हानही बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्याला दिले. Maharashtra Politics : धनंजय मुंडेंचा विरोधकांना टोला; म्हणाले, ‘तुमचा भाबडेपणा हा महाराष्ट्रातील जनतेला …’ बच्चू कडू सारख्या लोकांना जनता त्यांची औकात दाखवून देते. तर मी तर वयाने आणि अनुभवाने लहान आहे. मी माजी सैनिकाची मुलगी असून माझी पात्रता तर बरेचशे लोक काढत असतात. त्यांनीही काढली. माजी सैनिकाच्या परिवाराची औकात काढणाऱ्यांना जनतेनी त्यांची जागा दाखवून दिली आहे, असे प्रत्युत्तर नवनीत राणा यांनी बच्चू कडू यांना दिले. आपल्या स्वत:च्या मतदारसंघात दिवे लावू शकले नाहीत, तर दुसऱ्याच्या मतदारसंघात काय दिवे लावतील. असा टोलाही नवनीत राणांनी लगावला.