Maharashtra Politics । लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर केंद्रात पुन्हा एकदा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार स्थापन झाले आहे. पंतप्रधान मोदींसोबतच त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांचाही शपथविधी सोहळा पार पडला. एनडीए सरकारने तिसऱ्या टर्मसाठी शपथ घेतल्याच्या एका दिवसानंतर सोमवारी संध्याकाळी मंत्रिमंडळाच्या खात्यांची घोषणा करण्यात आली. अशात लवकरच राज्यात विधान सभा निवडणूक होणार आहे. लोकसभेत महाविकास आघाडीच्या ३१ जागा जिंकल्या आहे तर महायुतीला १८ जागा मिळवल्या आहे. आता दोन्ही आघाडीकडून येत्या विधानसभेत जास्त मताधिक्य मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. दरम्यान, विधान सभेत महायुतीच्या जास्त जागा जिंकणार असल्याच्या दाव्यावर आता काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी शिंदे गटाविरोधात ट्विट करत डिवचलं आहे. तसेच प्रफुल पटेल यांनाही मंत्रिपदावरून टोला लगावला आहे. विधानसभेत महाराष्ट्रात एनडीएचं सरकार येणार नसल्याचेही दावा जयराम रमेश यांनी केला आहे. जयराम रमेश यांनी म्हणाले,’प्रफुल्ल पटेल यांनी एक तृतीयांश ‘प्रधानमंत्री’ची ऑफर म्हणजे “पदावनती” असल्याचे सांगत त्यांच्या मंत्रालयात राहण्याची ऑफर नाकारली आहे. त्यांना माहित असले पाहिजे की बीजेपी ब्रँडच्या वॉशिंग मशीनचे एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे त्यात विविध मोड आहेत ते म्हणजे स्लो, फास्ट आणि सुपर-फास्ट त्यांनी ते कट केला नसावा.दुसरीकडे रवनीत बिट्टू लुधियाना मध्ये त्यांच्या पूर्वाश्रमीच्या पक्षाकडून पराभव झाल्यानंतर सुद्धा ते सुपर-फास्ट मोडवर आहेत. दुसरे व्यक्ती ज्यांच्यावर त्यांची कृपादृष्टी झाली नाही ते म्हणजे श्री एकनाथ शिंदे यांच्याकडे फक्त एक राज्यमंत्री पदाचा (स्वतंत्र कार्यभार) आहे . पण त्यांच्या पेक्षाही कमी खासदार असुनही श्री जितन राम मांझी, श्री चिराग पासवान आणि श्री एचडी कुमारस्वामी हे त्यांच्या पेक्षा वरचढ ठरले आहेत. पहीलतर हे प्रधानमंत्री महाराष्ट्रातील सर्व गुंतवणूक गुजरातमध्ये घेऊन जातात आणि आता ते महाराष्ट्रातल्या आपल्या युतीच्या मित्रपक्षांना निकृष्ट समजतात व हि तिच युती आहे त्यांनी जी दोन पक्ष फोडून निर्माण केली.आगामी काळात महाराष्ट्र होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत एनडीएचा पराभव होण्यापूर्वीच त्यांनी आपले सूडाचे राजकारण सुरू केले आहे.’ असेही ते म्हणाले.