या बैठकीत अंतर्गत वाद टाळण्यासाठी ‘समन्वय समिती’ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या समितीमध्ये काँग्रेसकडून खासदार हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) कडून सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कडून खासदार अनिल देसाई आणि आमदार अनिल परब यांचा समावेश आहे.
\n१७ नोव्हेंबरनंतर पुन्हा बैठक होणार –
\nबैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना नेत्यांनी आगामी निवडणुकांची तयारी हाच मुख्य अजेंडा असल्याचे स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी माहिती दिली की, स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार सर्व जिल्हाध्यक्षांना देण्यात आले आहेत. कोणताही पेचप्रसंग निर्माण झाल्यास ही नवनियुक्त समन्वय समिती त्यावर तोडगा काढेल, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले. पुढील रणनीतीवर चर्चा करण्यासाठी १७ नोव्हेंबरनंतर पुन्हा बैठक होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मनसेबाबत भूमिका स्पष्ट –
\nयावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मनसेसोबतच्या संभाव्य युतीबाबत मोठे विधान केले. ते म्हणाले, “मनसेबाबतचा कोणताही अधिकृत प्रस्ताव अद्याप आमच्याकडे आलेला नाही. प्रस्ताव आल्यावरच चर्चा होईल. महाविकास आघाडी म्हणून आम्ही दोन निवडणुका एकत्र लढलो आहोत आणि समान विचार असणारे पक्ष एकत्र राहावेत, ही आमची भूमिका आहे.”