Maharashtra Politics : बंडाची खबर मला महिन्यापूर्वीच लागली होती; ‘या’ बड्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरून एक अत्यंत धक्कादायक आणि मोठी बातमी (Maharashtra Politics) समोर येत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील 9 पैकी 6 खासदार फुटल्याच्या वृत्ताने खळबळ उडालेली असतानाच, आता ठाकरे गटाकडून अत्यंत आक्रमक पावले टाकली जात आहेत.

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरून एक अत्यंत धक्कादायक आणि मोठी बातमी (Maharashtra Politics) समोर येत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील 9 पैकी 6 खासदार फुटल्याच्या वृत्ताने खळबळ उडालेली असतानाच, आता ठाकरे गटाकडून अत्यंत आक्रमक पावले टाकली जात आहेत.
उद्या (बुधवारी) पक्षाने सर्व खासदारांची एक तातडीची बैठक बोलावली असून, सर्वच खासदारांना पक्षशिस्तीचे पालन करण्यासाठी अधिकृत ‘व्हीप’ (Whip) जारी करण्यात आला आहे. उद्याच्या या बैठकीला नेमके किती खासदार प्रत्यक्ष हजेरी लावतात, यावरच आता ठाकरे गटाचे संसदेतील भवितव्य स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, या संपूर्ण राजकीय भूकंपावर शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी एक मोठा आणि खळबळजनक गौप्यस्फोट (Maharashtra Politics) केला आहे. “पक्षात फूट पडणार आणि ६ खासदार सोडून जाणार, याची पूर्वकल्पना मला एक महिन्यापूर्वीच आली होती,” असा दावा खैरेंनी केला आहे.
“आई-वडील आणि साईबाबांची खोटी शपथ घेतली!”
बंडखोर खासदारांवर तीव्र शब्दांत हल्लाबोल करताना चंद्रकांत खैरे भावूक आणि आक्रमक झालेले पाहायला मिळाले. ते म्हणाले “ज्या आदरणीय शिवसेनाप्रमुखांनी ही शिवसेना मराठवाड्यात रक्ताचे पाणी करून रुजवली, तिथून आमचे तीन-तीन खासदार निवडून आले.
स्वतः उद्धव साहेबांनी या सर्वांसाठी सभा घेतल्या, प्रचार केला आणि त्यांना संसदेत पाठवले. मात्र, आज त्यांनीच उद्धव साहेबांचा घोर अपमान केला आहे. यांनी साहेबांना दिलेले वचन पाळले नाही. कोणी आपल्या आई-वडिलांची शपथ घेतली होती, तर कोणी शिर्डीच्या साईबाबांची शपथ घेतली होती! पण यांच्या अशा खोट्या शपथेवर आता जनतेने विश्वास तरी कसा ठेवायचा?”
तुम्ही शिंदेंचे तरी कसे होणार?”
खासदार फुटण्यामागे मोठे आर्थिक व्यवहार असल्याचा थेट आरोप खैरेंनी केला. “हा सगळा प्रकार केवळ आणि केवळ पैशांचा आहे. ६ जण बाजूला जात आहेत हे मला महिनाभरापूर्वीच समजले होते. अशी खोटी फाटाफट करून तुम्ही तुमचे तात्पुरते बळ वाढवत आहात. मात्र, या खोट्या बळाचा काहीही फायदा होणार नाही,” असा इशारा त्यांनी विरोधकांना दिला.
पुढे बोलताना त्यांनी बंडखोरांना टोला लगावला की, “तुम्ही जे आज उद्धव ठाकरेंचे होऊ शकले नाहीत, ते उद्या एकनाथ शिंदेंचे तरी काय होणार? तुम्ही त्यांनाही कधीतरी नक्कीच धोका देणार!”
९१ च्या छगन भुजबळांच्या बंडाची आठवण
पक्षातील या संकटसमयी जुन्या आठवणींना उजाळा देत खैरे म्हणाले, “वर्ष १९९१ मध्ये जेव्हा छगन भुजबळ हे १५ आमदारांना सोबत घेऊन फुटले होते, तेव्हाही आम्हा सच्च्या शिवसैनिकांना खूप वाईट वाटले होते. आज ३५ वर्षांनंतर ही खासदारांची फूट पाहून तशाच वेदना होत आहेत. मात्र, शिवसेनेचा इतिहास संघर्षाचा आहे. अशा फुटीमुळे शिवसेना संपत नाही. सामान्य शिवसैनिक आता चवताळून उठला आहे आणि आम्ही सर्वजण मैदानात उतरून पुन्हा संघर्ष करू!”
व्हीपच्या अस्त्राने बंडखोरांची कोंडी करण्याचा प्रयत्न
ठाकरे गटाने जारी केलेल्या ‘व्हीप’मुळे आता बंडखोर खासदारांची कायदेशीर कोंडी होण्याची शक्यता आहे. जर बंडखोर खासदारांनी उद्याच्या बैठकीला दांडी मारली, तर पक्ष त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची टांगती तलवार ठेवू शकतो. त्यामुळे उद्या दिल्ली आणि मुंबईत होणाऱ्या (Maharashtra Politics) घडामोडींकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे.






