Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंनंतर शरद पवारांच्या पक्षात फूट? राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून (Maharashtra Politics) सध्या अत्यंत खळबळजनक वृत्त समोर येत असून, सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये पडद्यामागे वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत.

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून (Maharashtra Politics) सध्या अत्यंत खळबळजनक वृत्त समोर येत असून, सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये पडद्यामागे वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी बंडखोरी केल्यामुळे आधीच राज्यात राजकीय (Maharashtra Politics) नाट्य रंगात आले असताना, आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातही मोठी फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विरोधी बाकांवर असलेल्या या दोन्ही प्रमुख पक्षांमधील अंतर्गत कुरबुरींमुळे आगामी काळात राज्याच्या राजकारणाला एक वेगळीच कलाटणी मिळण्याची चिन्हे आहेत.
ठाकरे गटाच्या सहा खासदारांनी पुकारलेल्या बंडामुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडालेली आहे. हे बंडखोर खासदार लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत अधिकृतपणे सामील होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
ठाकरे गटाकडून हे बंड रोखण्यासाठी आणि आपल्या खासदारांची मनधरणी करण्यासाठी तातडीने प्रयत्न करण्यात आले, परंतु सध्याची परिस्थिती पाहता या प्रयत्नांना यश मिळण्याची शक्यता खूपच कमी असल्याचे बोलले जात आहे.
कोणत्याही प्रकारची कायदेशीर अडचण येऊ नये, म्हणून सर्व कायदेशीर बाबींची काटेकोरपणे चाचपणी केली जात असून त्यानंतरच या खासदारांचा शिंदे गटातील प्रवेश अधिकृतपणे जाहीर केला जाईल. दुसरीकडे, या बंडखोरीला चोख उत्तर देण्यासाठी ठाकरे गटानेही कंबर कसली असून, या खासदारांच्या अपात्रतेसाठी कायदेशीर मार्गांचा अवलंब करण्यास सुरुवात केली आहे.
ठाकरे गटात ही पडझड सुरू असतानाच, आता शरद पवार यांच्या पक्षालाही मोठा धक्का बसण्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या विश्वासनीय माहितीनुसार, शरद पवार यांच्या पक्षातील काही खासदार सध्या अजित पवार गटाच्या नेत्या आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या संपर्कात आहेत.
या दोन्ही गटांमध्ये पडद्यामागे मोठ्या गुप्त घडामोडी घडत असून, खासदार आणि सुनेत्रा पवार यांच्यात सातत्याने चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. हे राजकीय नाट्य केवळ राज्यापुरते मर्यादित नसून केंद्रीय पातळीवरही याचे पडसाद उमटू लागले आहेत.
सुनेत्रा पवार यांनी आपल्या संपर्कात असलेल्या या खासदारांबाबत थेट केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांच्याशी दिल्लीत सविस्तर चर्चा केल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे, या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीला खासदार पार्थ पवार हेदेखील उपस्थित होते, ज्यामुळे या संभाव्य फुटीच्या चर्चेला अधिकच बळ मिळाले आहे.
या सर्व घडामोडींनंतर आता नेमके कोणते खासदार सुनेत्रा पवार यांच्या संपर्कात आहेत, याबाबत राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षाने उत्कृष्ट कामगिरी करत तब्बल आठ जागांवर विजय मिळवला होता, तर दुसरीकडे अजित पवार यांच्या पक्षाला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले होते.
आता शरद पवारांच्या याच आठ खासदारांपैकी काही खासदार बंडखोरीच्या तयारीत असल्याचे बोलले जात असले, तरी हे खासदार नेमके किती आहेत आणि त्यांची नावे काय आहेत, हे अद्याप पूर्णपणे गुलदस्त्यात आहे. ठाकरे आणि पवार या दोन्ही पक्षांमधील या संभाव्य बंडखोरीमुळे आगामी काळात महाराष्ट्राच्या सत्तेची (Maharashtra Politics) गणिते कशी बदलणार, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.





