पुणे – ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. ओबीसी आरक्षणासाठी राज्यभरात 1 हजार ठिकाणी भाजपकडून आज (दि. 26 जून) राज्यव्यापी चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे.
याचपार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज सकाळी 10 वाजता पुण्यातील कात्रज चौकात या आंदोलनाला सुरुवात झाली. दरम्यान, आंदोलनाला राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे,
ओबीसी आघाडी प्रदेश अध्यक्ष योगश टिळेकर, खासदार गिरीश बापट, शहराध्यक्ष जगदीश मुळीक तसेच पक्षाचे इतर आमदार आणि नगर सेवक उपस्थित असणार आहेत.