पुणे – किष्किंधानगर, सुतारदरा परिसरातील राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अधिकृत उमेदवार हर्षवर्धन दीपक मानकर, तृप्ती निलेश शिंदे आणि कांता नवनाथ खिलारे यांनी कोपरा सभांच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधत समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर या समस्या सोडविण्याबरोबरच प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचे व्हिजन मांडले, त्यावेळी नागरिकांनी हर्षवर्धन मानकर यांच्यासह उमेदवारांचे कौतुक करीत शुभेच्छा दिल्या. रामबाग काॅलनी-शिवतीर्थनगर प्रभागातील राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अधिकृत उमेदवार हर्षवर्धन मानकर, तृप्ती शिंदे आणि कांता खिलारे यांनी मागील तीन ते चार दिवसांपासून सुतारदरा, किष्किंधानगर परिसरात पदायात्रा, कोपरा सभा घेण्यात आल्या. यावेळी महिलांकाडून ठिकठिकाणी औक्षण करीत पदयात्रेत सहभागी झाले. महिलांसह गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांचा पाठिंबा वाढत असून, कोपरा सभेच्या माध्यमातून उमेदवाराकडून परिसरातील समस्या जाणून त्याची नोंद घेतली जात आहे. तसेच, या समस्या प्राधान्याने सोडविण्यासाठी तत्काळ उपाययोजनाही केली जात आहे. संध्याकाळी किष्किंधानगर येथील सुदर्शन मित्र मंडळ याठिकाणी कोपरा सभा पार घेतली. नागरिकांना दर्जेदार सेवा, पारदर्शक प्रशासनासह सुरक्षिततेसह किष्किंधानगर परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काॅंग्रेस कटिबद्ध असल्याचे अश्वासन हर्षवर्धन मानकर, तृप्ती शिंदे आणि कांता खिलारे यांनी उपस्थित नागरिकांना दिला.