मुख्यमंत्री, स्थळ अन् वेळही ठरली! वाचा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कधी, कुठे…

Maharashtra New CM – विधानसभा निवडणुकांमध्ये मिळालेल्या अभूतपूर्व विजयानंतर महाराष्ट्रात सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. पुढील मुख्यमंत्री कोण होणार, हा २३ तारखेला लागलेल्या निकालानंतर रखडलेला प्रश्न दिल्लीमध्ये गुरुवारी रात्री अमित शहांच्या दरबारी सुटला आहे.
राज्यात सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपच्या वाट्याला मुख्यमंत्रीपद येणार असून २०१९ विधानसभा निवडणुकांमधील देवेंद्र फडणवीस यांचे ‘मी पुन्हा येईल’ हे स्वप्न २०२४ मध्ये साकार होणार आहे.
सुत्रांकरवी मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी मुंबईतील आझाद मैदानावर होणार आहे. शपथविधीसाठी ५ डिसेंबरचा मुहूर्त काढण्यात आल्याचेही समजते. | Maharashtra New CM
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी दिल्लीत मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर सातारा जिल्ह्यातील आपले मुळगाव गाठले आहे. यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चा जोर धरत आहेत.
शिंदे यांची नाराजी दूर करण्यासाठी अमित शहा यांनी त्यांना पुन्हा एकदा दिल्लीला पाचारण केले असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. | Maharashtra New CM
अमित शहा यांच्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असले तरी अद्याप त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. नाव घोषित करण्याची औपचारिकता बाकी असल्याचे भाजप नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. | Maharashtra New CM





