Maharashtra Election : महाराष्ट्रात पुन्हा एकदा निवडणुकांचे वारे वाहू लागले असून, नाशिक जिल्ह्यातील काही नगरपंचायतींसाठी पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. मनमाड, देवळा आणि पेठ नगरपंचायतीतील रिक्त जागांसाठी 20 जून रोजी मतदान पार पडणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली. (Maharashtra Election) आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिनेश वाघमारे यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर करत सांगितले की, 2025 मध्ये झालेल्या नगरपंचायत निवडणुकांनंतर काही सदस्यांचे निधन किंवा अन्य कारणांमुळे काही जागा रिक्त झाल्या आहेत. राज्यभरातील अशा 29 रिक्त पदांसाठी पोटनिवडणूक होत आहे. त्यापैकी नाशिक जिल्ह्यातील मनमाडमधील 2, पेठमधील 1 आणि देवळामधील 1 अशा एकूण 4 जागांसाठी मतदान होणार आहे. (Maharashtra Election) राज्य निवडणूक आयोगाने या पोटनिवडणुकांसाठी तयारी पूर्ण केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 20 जूनला मतदान होणार असून, 1 जुलैची मतदार यादी वापरण्यात येणार आहे. मतमोजणी केंद्रांची तयारी, कर्मचारी वर्ग आणि मतदान यंत्रांची व्यवस्था पूर्ण झाली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांप्रमाणेच सर्व प्रक्रिया या निवडणुकीतही राबवली जाणार आहे, असे वाघमारे म्हणाले. (Maharashtra Election) मतपत्रिकेवरील चिन्हांच्या क्रमाविषयी माहिती देताना त्यांनी सांगितले की, मतदार यादीत चार गट करण्यात येतील. राज्य मान्यता प्राप्त पक्षांच्या चिन्हांना प्रथम प्राधान्य दिले जाईल, तर शेवटी अपक्ष उमेदवारांची चिन्हे असतील. (Maharashtra Election) दरम्यान, रखडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांबाबतही त्यांनी महत्त्वाची माहिती दिली. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यामुळे जिल्हा परिषद निवडणुका प्रलंबित आहेत. 23 जुलै रोजी येणाऱ्या निकालानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. (Maharashtra Election) तसेच, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एसआयआर प्रक्रियेबाबत कोणतीही अधिकृत मागणी आयोगाकडे आलेली नसल्याचेही त्यांनी सांगितले. मॅपिंगची प्रक्रिया सध्या सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. (Maharashtra Election)