Maharashtra MLC Election 2026: भाजपच्या शिक्षक-पदवीधर उमेदवारांची यादी; कोणते चेहरे उतरणार मैदानात?
Maharashtra MLC Election 2026: तीन मतदारसंघांतील उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब

Maharashtra MLC Election 2026: विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपने आपल्या अधिकृत उमेदवारांची घोषणा केली आहे. पक्षाच्या केंद्रीय कार्यालयाकडून ४ ऑक्टोबर २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, समितीने तीन मतदारसंघांतील उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब केले आहे. भाजपच्या केंद्रीय कार्यालयातून जारी करण्यात आलेल्या या पत्रावर पक्षाचे राष्ट्रीय मुख्यालय प्रभारी तथा राज्यसभा खासदार तरुण चुघ यांची स्वाक्षरी आहे.
भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारांची नावे
पुणे विभाग पदवीधर : या मतदारसंघातून भाजपने डॉ. स्मिता योगेश जाधव यांना उमेदवारी दिली आहे. तर नागपूर विभाग पदवीधर : नागपूर पदवीधर जागेसाठी सुधाकर विठ्ठलराव कोहळे यांच्या नावावर पक्षाने मोहर उमटवली आहे. पुणे विभाग शिक्षक : पुणे शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ मुरलीधर गावडे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे.
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ : उमेदवार: सुधाकर विठ्ठलराव कोहळे
नागपूर पदवीधर मतदारसंघ हा राजकीयदृष्ट्या अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जातो. भाजपचे माजी आमदार आणि अनुभवी नेते सुधाकर कोहळे यांच्यावर पक्षाने पुन्हा एकदा विश्वास दाखवत त्यांना या मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.
पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ उमेदवार: डॉ. स्मिता योगेश जाधव
पुणे पदवीधर मतदारसंघातून पक्षाने डॉ. स्मिता योगेश जाधव यांना संधी दिली आहे. पदवीधरांचे प्रश्न मांडण्यासाठी आणि उच्चशिक्षित मतदारांना आकर्षित करण्यासाठी हा महिला चेहरा मैदानात उतरवण्यात आला आहे.
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ उमेदवार: कौस्तुभ मुरलीधर गावडे
पुणे शिक्षक मतदारसंघातून पक्षाने कौस्तुभ मुरलीधर गावडे यांना रिंगणात उतरवले आहे. शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न आणि शैक्षणिक क्षेत्रातील समस्यांवर मात करण्यासाठी गावडे यांच्या उमेदवारीचा भाजपला मोठा फायदा होईल असा दावा केला जात आहे.
हेही वाचा:
Abhijit Deepke: “CJP ला बदनाम करण्यासाठी…” ; अभिजीत दीपकेचे प्रत्युत्तर, कोणावर साधला निशाणा?






