पोलिसांना शिवीगाळ; दोघांवर गुन्हा दाखल

मंचर – मंचर (ता. आंबेगाव) येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर असलेल्या पटांगणामध्ये भांडत असणाऱ्या दोघांना पोलीस समाजावत असताना त्यांनी दोन पोलिसांनाच शिविगाळ आणि दमदाटी केल्याची घटना गुरुवारी (दि.1) रात्री घडली. याप्रकरणी अक्षय वाळुंज,अक्षय पिंगळे यांच्या विरोधात मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवार दि. 1 रोजी सायंकाळी मंचर ग्रामपंचायत कार्यालयासमोर मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस जवान फिरोज मोमीन यांना गर्दी जमलेली दिसली.

तेथे त्यांनी जाऊन पाहिले असता त्याठिकाणी अक्षय विलास वाळुंज रा.वाळुंजवाडी,अक्षय कैलास पिंगळे रा.वडगांव काशिंबेग हे आपआपसात भांडण करत होते.तेंव्हा पोलिस जवान फिरोज मोमीन यांनी त्यांना आपआपसात भांडण करु नका.

तुमची काही तक्रार असेल तर तुम्ही पोलिस ठाण्यात चला असे बोललो असता अक्षय विलास वाळुंज याने पोलिस जवान फिरोज मोमीन यांची कॉंलर धरुन तु माझी क ाही ऊखडु शकत नाही.तुला बघुन घेतो.माझा पाहुणा पोलिस अधिकारी आहे .

तुझी नोकरीच घालवतो.असे बोलुन शिवीगाळी दमदाटी केली.अक्षय कैलास पिंगळे यांनी पो लिस जवान फिरोज मोमीन यांच्यासोबत असलेले पोलिस जवान ईश्‍वर कदम यांना शिवीगाळ दमदाटी करुन सरकारी कामात अडथळा

आणल्याप्रकरणी अक्षय विलास वाळुंज वय 27 रा.वाळुंजवाडी व अक्षय कैलास पिंगळे वय 26 रा.वडगाव काशिंबेग यांच्याविरोधात गुन्हा रजिस्टर नंबर 396/2021 भारतीय दंड विधान कलम 353,323,504,506,34 प्रमाणे पोलिस जवान फिरोज मोमीन यांनी फिर्याद दिली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक सुधाकर कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरिक्षक अर्जुन शिंदे करत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.