Maharashtra IAS Transfer: महाराष्ट्रात 8 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई: राज्य प्रशासनात खांदेपालट सुरूच असून, महाराष्ट्र सरकारने ८ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. यामध्ये वरिष्ठ आयएएस अधिकारी नितीन पाटील यांची महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक विपणन महासंघाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी, तर आप्पासाहेब धुळाज यांची ओबीसी बहुजन कल्याण विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
बदली झालेल्या अधिकाऱ्यांची यादी:
नितीन पाटील (IAS:SCS:2007): आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता, नवी मुंबई येथून महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक विपणन महासंघ, मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक.
ए.बी. धुळाज (IAS:SCS:2009): व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक विपणन महासंघ येथून सचिव, ओबीसी बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई.
लहू माळी (IAS:SCS:2009): व्यवस्थापकीय संचालक, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ येथून आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता, नवी मुंबई.
बाबासाहेब बेलदार (IAS:SCS:2015): अतिरिक्त विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजी नगर येथून व्यवस्थापकीय संचालक, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, मुंबई.
मुरुगनंथम एम. (IAS:RR:2020): मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गोंदिया येथून मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बीड.
आदित्य जीवने (IAS:RR:2021): मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बीड येथून सहव्यवस्थापकीय संचालक, MAHADISCOM, छत्रपती संभाजी नगर.
मिन्नू पी.एम. (IAS:RR:2021): सहायक जिल्हाधिकारी, भातकुली-तिवसा उपविभाग, अमरावती येथून मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गोंदिया.
मानसी (IAS:RR:2021): सहाय्यक जिल्हाधिकारी, देसाईगंज उपविभाग, गडचिरोली येथून महापालिका आयुक्त, लातूर महानगरपालिका.
यापूर्वीही अनेक आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून, नवल किशोर राम (पुणे महापालिका आयुक्त), शीतल तेली-उगले (क्रीडा आणि युवा आयुक्त, पुणे), सौरभ कटियार (जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर) यांच्यासह इतरांची नवीन जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. या बदल्यांमुळे प्रशासकीय कामकाजात अधिक गतिमानता येण्याची अपेक्षा आहे.





