Farmer Loan : राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या दोन लाखांच्या कर्जमाफीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. सहकार विभागाने राज्यभरातील पात्र शेतकऱ्यांची माहिती संकलित करून राज्य सरकारकडे सादर केली असून, मेअखेर होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत कर्जमाफीवर अंतिम निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Farmer Loan) सूत्रांच्या माहितीनुसार, अंदाजे ३४ ते ३५ लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळू शकतो. तसेच, पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ३० जूनपूर्वी कर्जमाफीची रक्कम जमा होण्याची शक्यता आहे. (Farmer Loan) सहकार विभागाने राज्यातील बँकांकडून तब्बल ५४ प्रकारची माहिती मागवली होती. यामध्ये बँकेची शाखा, आयएफएससी कोड, खाते क्रमांक, आधार क्रमांक, जमीन नोंदी, पीककर्ज, कर्जाची मुदत, परतफेडीची माहिती, व्याजाची रक्कम अशा विविध तपशीलांचा समावेश होता. (Farmer Loan) ही माहिती २०२२-२३, २०२३-२४ आणि २०२४-२५ या तीन आर्थिक वर्षांतील थकबाकीदार आणि नियमित कर्जदार शेतकऱ्यांबाबत गोळा करण्यात आली आहे. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेल्या पीककर्जधारकांना दोन लाखांपर्यंत कर्जमाफी देण्याचा प्रस्ताव आहे. (Farmer Loan) याशिवाय, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्याचीही घोषणा करण्यात आली आहे. (Farmer Loan) दीपक तावरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बँकांकडून आवश्यक माहिती प्राप्त झाली असून ती सरकारकडे सादर करण्यात आली आहे. आता सरकारकडून पात्रतेचे निकष निश्चित केले जात आहेत. त्यानंतर मंत्रिमंडळात अंतिम निर्णय होईल. दरम्यान, राज्य सरकारने कर्जमाफीच्या अभ्यासासाठी प्रविणसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. या समितीने एप्रिलमध्येच आपला अहवाल सरकारला सादर केला आहे. सरकारकडून अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर कर्जमाफीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बचत खात्यात जमा केली जाणार असल्याची माहितीही समोर आली आहे. (Farmer Loan)