नागपूर – नागपूरातील हुडकेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत किरकोळ कारणावरून पोल्ट्री फार्म चालकाची हत्या करण्यात आली आहे. देवदर्शन मेश्राम (रा. नेहरू नगर, नागपूर) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. हत्येनंतर आरोपी फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. पोल्ट्री फार्म चालक मृत देवदर्शन मेश्राम आणि आरोपी सुरज बागडे हे एकास वस्तीत राहतात. काही दिवसांपूर्वी दोघांमध्ये किरकोळ कारणावरुन वाद झाला होता. हे प्रकरण पोलीस स्टेशनपर्यंतही पोहोचले होते. दरम्यान, मेश्राम हे आरोपीला तू वारंवार भांडण का करतोस, असा जाब विचारायला गेले असता आरोपीने त्यांच्यावर कुऱ्हाडीने वार केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी मेश्राम यांना रुग्णालयात दाखल केले, मात्र तिथे त्यांचा मृत्यू झाला. पोलीस हत्येनंतर फरार झालेल्या आरोपीचा शोध घेत आहेत.