युनायटेड क्रिकेट क्‍लब संघाचा सनसनाटी विजयी

महाराष्ट्र क्रिकेट प्रिमियर लीग स्पर्धा

पुणे – हेमंत पाटील प्रतिष्ठान यांच्या तर्फे व महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट प्रिमियर लीग 2019 एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत अमेय सोमण(63धावा) याने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर युनायटेड क्रिकेट क्‍लब संघाने हेमंत पाटील क्रिकेट अकादमी ब संघाचा 27 धावांनी पराभव करून विजयी सलामी दिली.

व्हिजन क्रिकेट मैदान येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत प्रथम फलंदाजी करताना युनायटेड क्रिकेट क्‍लब संघाने 50 षटकात 8 बाद 269धावा केल्या. यात अमेय सोमण याने उत्कृष्ट फलंदाजी करत 64 चेंडूत 10चौकार व 1षटकाराच्या मदतीने 63धावा केल्या. अमेयला अद्वैय शिधयेने 52 चेंडूत 9चौकार व 1षटकारासह 55धावा करून सुरेख साथ दिली. अमेय सोमण व अद्वैय शिधये यांनी पहिल्या गड्यासाठी 106 चेंडूत 116 धावांची भागीदारी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. अमेय सोमण, अद्वैय शिधये बाद झाल्यानंतर मानसिंग निगडे 61धावा, अजित गव्हाणे 30धावा, राहुल देसाई 24धावा काढून संघाला 269 धावांचे लक्ष उभे करून दिले. हेमंत पाटील अकादमीकडून जितेंद्र भारतीने 30 धावात 5गडी बाद करून युनायटेड क्‍लबला मोठे आव्हान उभारण्यापासून रोखले.

या आव्हानाचा पाठलाग करताना हेमंत पाटील क्रिकेट अकादमी ब संघाचा डाव 37.1षटकात 242धावावर संपुष्टात आला. यात यश नाहर 41 चेंडूत 68धावा, शुभम दोशी 37 चेंडूत 40धावा, ऑस्टिन लाझरस 21 चेंडूत 24धावा व मनोज इंगळेची 29 चेंडूत 37धावांची खेळी अपुरी ठरली. युनायटेड क्‍लबकडून रामकृष्ण घोष( 3-48), तरुण वालानी(2-30), जयदीप खेत्री(1-16), अद्वैय शिधये(1-32)यांनी सुरेख गोलंदाजी केली. सामन्याचा मानकरी अमेय सोमण ठरला.

सविस्तर निकाल: साखळी फेरी :

युनायटेड क्रिकेट क्‍लब: 50 षटकात 8 बाद 269धावा(अमेय सोमण 63(64,10चौकार, 1षटकार), मानसिंग निगडे 61(72,3चौकार,4षटकार), अद्वैय शिधये 55(52, 9चौकार, 1षटकार),अजित गव्हाणे 30(21), राहुल देसाई 24(25), जितेंद्र भारती 5-30, यश नाहर 1-35) वि.वि.हेमंत पाटील क्रिकेट अकादमी ब: 37.1षटकात सर्वबाद 242धावा(यश नाहर 68(41,8चौकार,3षटकार), शुभम दोशी 40(37, 2चौकार,3षटकार), ऑस्टिन लाझरस 24(21), मनोज इंगळे 37(29), अनिकेत पोरवाल 18, रामकृष्ण घोष 3-48, तरुण वालानी 2-30, जयदीप खेत्री 1-16, अद्वैय शिधये 1-32);सामनावीर-अमेय सोमण.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.