मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा महायुतीला मोठे यश मिळाले तर महाविकास आघाडीला मोठा फटका बसल्याचे पाहायला मिळाले. महायुतीने 288 विधानसभा मतदारसंघात 230 ठिकाणी विजयाचा झेंडा फडकवलाय. यात भाजप 132, शिवसेना (एकनाथ शिंदे) 57 आणि राष्ट्रवादीला 41 (अजित पवार) जागांवर यश मिळाले. महायुतीकडून सत्तास्थापनेची तयारी सुरु असून मंत्रिमंडळाचा फॉर्म्युल्या आणि मंत्रिमंडळातील मंत्र्यांची नावे समोर आली आहेत. कसा आहे मंत्रीमंडळाचा फॉर्मुला ? मिळालेल्या माहितीनुसार 6-7 आमदारांमागे एक मंत्रिपद देण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यानुसार भाजपला सर्वाधिक 22-24, शिवसेनेला 10-12 आणि राष्ट्रवादीला 8-10 मंत्रिपदांची शक्यता आहे. मंत्रिमंडळात कोणाला मिळणार संधी? भाजपचे संभाव्य मंत्री देवेंद्र फडणवीस गिरीष महाजन सुधीर मुनगंटीवार चंद्रशेखर बावनकुळे मंगलप्रभात लोढा सुरेश खाडे प्रवीण दरेकर पंकजा मुंडे राहुल कुल नितेश राणे चित्रा वाघ प्रसाद लाड किसन कथोरे शिंदेंचे संभाव्य मंत्री एकनाथ शिंदे भरत गोगावले संजय शिरसाट प्रताप सरनाईक संजय राठोड गुलाबराव पाटील दादा भुसे राष्ट्रवादीचे संभाव्य मंत्री अजित पवार धननंज मुंडे दिलीप वळसे पाटील आदिती तटकरे छगन भुजबळ धर्मरावबाबा अत्राम अनिल पाटील