Maharashtra Cabinet Expansion । महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्ताराचे काउंटडाउन आता सुरू झाले आहे. या शपथविधी समारंभासाठी अनेक आमदारांना फोनही गेले आहे. नागपुरात आज अनेक नेते मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. दुपारी 4 वाजता हा शपथविधी समारोह पार पडणार आहे. अनेक नवीन आणि जुन्या चेहऱ्यांना संधी मिळणार आहे. मंत्रिमंडळात जास्तीत जास्त 43 मंत्री असू शकतात. त्यामुळेच या तिन्ही पक्षांनी 42 मंत्र्यांचं मंत्रिमंडळ निश्चित केलं आहे. फडणवीस, शिंदे आणि अजित पवारांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात कोणकोण असेल त्यावर एक नजर टाकुयात…. भाजपाचे 20 मंत्री कोणते? 1) देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री) 2) चंद्रशेखर बावनकुळे 3) नितेश राणे 4) शिवेंद्रराजे भोसले 5) चंद्रकांत पाटील 6) गिरीश महाजन 7) पंकजा मुंडे 8) जयकुमार रावल 9) राधाकृष्ष विखे-पाटील 10) गणेश नाईक 11) पंकज भोयर 12) मेघना बोर्डिकर 13) माधुरी मिसाळ 14) अतुल सावे 15) आकाश फुंडकर 16) अशोक उईके 17) आशिष शेलार 18) मंगलप्रभात लोढा 19) जयकुमार गोरे 20) संजय सावकारे शिवसेनेचे 12 मंत्री कोणते? 1) एकनाथ शिंदे (उपमुख्यमंत्री) 2) उदय सामंत 3) प्रताप सरनाईक 4) भरत गोगावले 5) शंभूराज देसाई 6) आशिष जैयस्वाल 7) गुलाबराव पाटील 8) संजय राठोड 9) संजय शिरसाट 10) दादा भुसे 11) प्रकाश आबिटकर 12) योगेश कदम राष्ट्रवादीचे 10 मंत्री कोणते? 1) अजित पवार (उपमुख्यमंत्री) 2) आदिती तटकरे 3) नरहरी झिरवाळ 4) दत्ता भरणे 5) हसन मुश्रीफ 6) बाबासाहेब पाटील 7) मकरंद पाटील 8) इंद्रनील नाईक 9) धनंजय मुंडे (नाव शेवटच्या क्षणापर्यंत निश्चित नाही.) 10) छगन भुजबळ (नाव शेवटच्या क्षणापर्यंत निश्चित नाही.)