Maharashtra Budget : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांचे बुधवारी विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या मृत्यूमुळे राज्यासह देशभरात शोककळा पसरली आहे. तसेच राजकीय वर्तुळातही एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.अशातच एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो की, राज्याचा आगामी अर्थसंकल्प (Maharashtra Budget) कोण सादर करणार? येत्या 23 फेब्रुवारीपासून महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Maharashtra Budget) सुरू होणार आहे. महाराष्ट्र हे आर्थिकदृष्ट्या देशातील आघाडीचे राज्य आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर करणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. अजित पवार सोडल्यास यंदा अर्थसंकल्पाची प्रक्रिया हाताळू शकतील, अशा तीन अनुभवी नेत्यांची नावे चर्चेत आहेत. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,राष्ट्रवादी शरद पवारचंद्र पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी अर्थमंत्री जयंत पाटील आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार हे अर्थसंकल्प मांडू शकतात. सध्याची राजकीय स्थिती पाहता सुधीर मुनगंटीवार यांना पुन्हा मंत्रिमंडळात सहभागी करून घेतले जाईल याबाबत साशंकता आहे. अशातच पुढील अर्थसंकल्प स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत सादर करतील आणि विधान परिषदेत ही जबाबदारी गतवर्षीप्रमाणे वित्त राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल पार पाडतील,अशी शक्यता आहे. याविषयावर एका वृत्तवाहीनीशी बोलताना राज्याचे वित्त राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल म्हणाले, आता समोर अधिवेशन आहे. या पाच तारखेपर्यंत आचारसंहिता आहे. Maharashtra Budget सध्या राज्यात काही ठिकाणी सुरू असलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रक्रियेनंतर म्हणजे साधारण 6 फेब्रुवारीनंतर याविषयी बैठका घेण्याबाबत ठरले होते. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये जिल्हा नियोजन समिती म्हणजे प्रत्येक जिल्ह्याचे डीपीडीसीच्या बैठका सध्या सुरू आहेत. जिल्ह्याच्या आराखड्यानुसार कोणत्या विभागाला किती निधी देण्याबाबतीत बैठका होतील, हे पाहावे लागले, अशी माहिती त्यांनी दिली. राजकीय दु:खवटा संपल्यावर अधिसूचना? महाराष्ट्राच्या नव्या अर्थसंकल्पासाठी जेमतेम एक महिन्याचा कालावधी उरलेला आहे. यासाठी अधिकारी वर्गाकडून प्राथमिक काम सुरु झाले आहे. अजित पवारांच्या अकाली एक्झिटमुळे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. देवेंद्र फडणवीस स्वतः अनुभवी आणि या क्षेत्रात जाणकार असल्याने या परिस्थितीवर राज्य शासन सहज मात करेल, असा विश्वास राज्यातील अर्थतज्ञ व्यक्त करीत आहेत. 3 दिवसांचा राजकीय दु:खवटा संपला की, त्यानंतर आवश्यक ती अधिसूचना काढण्यात येईल, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली. हे पण वाचा : Stock Market: शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी तेजी; ‘या’ कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ