Maharashtra Budget 2026 : राज्याचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला. महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच मुख्यमंत्री स्वतः अर्थसंकल्प मांडत असल्याची नोंद यावेळी झाली. विशेष म्हणजे अर्थसंकल्पाची बहुतांश तयारी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. मात्र त्यांच्या अपघाती निधनानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी हा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. अर्थसंकल्प सादर करताना फडणवीस म्हणाले की, हा अर्थसंकल्प २०४७ पर्यंतच्या विकासाच्या दिशेने वाटचाल करणारा आहे. समाजसुधारक महत्तम ज्योतिबा फुले यांच्या जन्माला २०० वर्षे पूर्ण होत असल्याने त्यानिमित्त राज्यात विविध कार्यक्रम आयोजित करण्यासाठी विशेष समिती स्थापन केली जाणार आहे. तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शताब्दी वर्षानिमित्त रायगड येथे पायाभूत सुविधा उभारण्यावर भर दिला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. याशिवाय राज्यात ‘सामाजिक समरसता वर्ष’ साजरे करण्याची घोषणा करण्यात आली. दरम्यान, शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे काम पूर्ण झाल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. अर्थसंकल्प सादर करताना फडणवीस यांनी दिवंगत नेते अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली. “अजितदादांनी तब्बल ११ वेळा अर्थसंकल्प मांडला. त्यांच्या कडक स्वभावामुळे प्रशासनात शिस्त राहिली,” असे सांगत त्यांच्या नावाने नागरी पुरस्कार सुरू केला जाईल. तसेच त्यांचे भव्य स्मारक उभारले जाईल, अशी घोषणा त्यांनी केली. दरम्यान, महाराष्ट्राच्या 2026-27 च्या अर्थसंकल्पात काय स्वस्त आणि काय महाग झालंय, याबाबत जाणून घेऊयात.. काय स्वस्त झालं? मधुमेहावरील उपचार कर्करोगावरील औषधे क्रीडा साहित्य वैद्यकीय उपकरणे सौर पॅनल काय महाग झालं? दारू सिगारेट तंबाखूजन्य पदार्थ अर्थसंकल्पातल्या १० मोठ्या घोषणा संत गाडगेबाबा तीर्थक्षेत्र सर्किट विकसित करण्यात येणार आहे. डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शताब्दी वर्षानिमित्त रायगड येथे पायाभूत सुविधा केल्या जातील. ग्रामसमृद्धी अभियान राबवलं जाणार आहे. अजित दादा पवार यांनी ११ वेळा अर्थसंकल्प मांडला. त्यांच्या करडी स्वभावामुळे शिस्त राहिली. त्यांना श्रद्धांजली म्हणून अजित दादा पवार यांचे भव्य स्मारक उभारले जाईल. त्यांच्या नावाने नागरी पुरस्कार सुरु केला जाईल. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा तिसरा टप्पा मंजूर करण्यात आला आहे. ग्रामसडक योजनेअंतर्गत ३० हजार गावे जोडण्यात आली आहेत. २४५० किमी रस्त्यांची कामं पूर्ण झाली असून २३ हजार पूलांचं काम हाती घेतलं आहे. मुंबई-पुणे जलदगती ट्रेनसाठी तरतूद करण्यात आली आहे. गोपीनाथ मुंडे अपघात योजनेत शेतमजूरांचा सहभाग करणार. पाणंद रस्त्यांना मान्यता दिली आहे. ३० लाखांहून अधिक शेतकऱ्यांना हवामान, बाजारभाव माहिती दिली जात आहे. आगामी दोन वर्षांत महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियानाची सुरुवात होणार आहे. राज्याचे नवे गुंतवणूक धोरण जाहीर करण्यात आले आहे. प्रत्येक जिल्ह्यात सुक्ष्म व लघू केंद्र स्थापन केले जातील. सूक्ष्म, लघु आणि मध्य उद्योग केंद्र उभारणार आहोत. ५० लाख प्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहेत. प्रधानमंत्री सौर योजनेअंतर्गत रुफ टॉप सोलर बसवणार, बांबू विकास प्रकल्प वाढवणार, परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल आहे. मुंबई आणि पुण्यात ५० अब्ज डॉलरचे केंद्र तयार करण्याचे उद्दिष्ट आहे. मुंबईत केंद्राच्या मदतीने इंडियन इन्स्टिट्यूट क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी सुरु, पुणे हे जीसीसीसाठी देशात सर्वाधिक पसंतीचे शहर आहे. जगात गेमिंग क्षेत्रात अव्वल होण्यासाठी महाराष्ट्रात २९५ पेक्षा जास्त गेमिंग स्टुडिओ तयार करणार. सातारा जिल्ह्यातील वासोटा किल्ल्यावर पर्यटकांसाठी रोप वे प्रकल्प उभारणार आहोत. नागपूरच्या रामटेकमध्ये तिसरी चित्रसृष्टी उभारणार आहोत. मुंबईत अजून एक भुयारी मेट्रो करणार, अटल सेतू मुंबई विमानतळाला जोडणार, राज्यात १ हजार २०० किमीचे मेट्रो मार्ग उभारणार आहोत. ६ हजार किमीचे द्रुतगती मार्ग विकसित करणार आहोत. २०२९ पर्यंत १२६५ किमी मेट्रो मार्गिका तयार करणार दक्षिण मुंबईला २०२८ पर्यंत समृद्धी महामार्गासोबत जोडणार आहोत. वर्सोवा-भाईंदर किनारी मार्ग डिसेंबर २०२८ पर्यंत पूर्ण करणार, पनवेल ते कर्जत मार्ग अंतिम टप्प्यात असून लवकरच वाहतुकीसाठी खुला करणार कर्जमाफी योजना राबवण्याचं आश्वासन दिलं होतं. ३० सप्टेंबर २०२५ रोजी पीक कर्ज थकित असलेल्या शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अशीच सुरु राहणार आहे. या योजनेकरता आवश्यक ती भरीव तरतूद करण्यात आली आहे.