पुणे – बॅंक ऑफ महाराष्ट्रने 13 डिसेंबरपासून सणासुदीच्या हंगामातील धमाका ( रिटेल बोनांझा ) म्हणून गृह कर्ज व चारचाकी वाहनांच्या कर्जाच्या व्याजदरात कपात केली असून पूर्वीच्या अनुक्रमे 6.80 % व 7.05 % वरुन ते 6.40 % व 6.80 % वर आणले आहेत.
धमाका व्याजदर हे कर्जदाराच्या पतमापनाशी ( क्रेडिट स्कोअर ) निगडीत आहेत. धमाका अंतर्गत बॅंक ऑफ महाराष्ट्रने सोने, गृह व चारचाकी वाहन कर्जावरील प्रक्रिया शुल्क अगोदरच माफ केले आहे. धमाका देकारामुळे ग्राहकांच्या कर्जावरील खर्चात बचत होऊन त्यांना कर्ज घेण्याचा आनंद लूटता येईल असे मत बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी ए एस राजीव यांनी व्यक्त केले.
गृह व चारचाकी वाहनांसाठीच्या कर्जावरील व्याजदरात धमाका ऑफर देऊ करून आम्ही बॅंकिंग उद्योगातील रिटेल कर्जावरील सर्वात कमी व्याज दर देऊ केले आहेत. ग्राहकांनी या कमी केलेल्या व्याजदराचा लाभ घ्यावा असे आवाहन बॅंकेचे कार्यकारी संचालक हेमंत टम्टा यांनी केले आहे.