विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर शिरूर शहरात जवानांकडून सशस्त्र पथ संचलन

शिरूर – आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २०२४ च्या पार्श्वभुमीवर शिरूर शहरात पोलिस व सीमा सुरक्षा दलाने विविध भागात सशस्त्र पथ संचलन केले आहे.
पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण पंकज देशमुख ,अपर पोलीस अधीक्षक पुणे विभाग रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरूर उपविभाग प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली हे पाठ संचलन पार पडले.
पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी त्यांच्या कडील ४ अधिकारी व ३० अंमलदार तसेच सीमा सुरक्षा दलाकडील ५ अधिकारी व ७० जवान असे सशस्त्रासह शिरूर पोलीस स्टेशन पासुन शिरूर शहरामधील बी. जे. कॉर्नर, रामआळी, पाच कंदील चौक, डंबे नाला, सिध्दार्थनगर, आण्णाभाऊ साठे चौक, शिरूर बस स्थानक, इंदिरा गांधी पुतळा, बी.जे. कॉर्नर असे पथ संचलन केले आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये होणारे प्रचार, मतदान, मतमोजणी इत्यादी या प्रक्रियेकरिता पोलीस प्रशासन सज्ज असुन कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता सदरचे पथ संचलन करण्यात आलेले आहे.





