तिकीट कापल्यानंतरही भाजप आमदार आपल्या भूमिकेवर ठाम म्हणाले,’मी जे बरोबर होतं, तेच बोललोय…लाडकी बहीण योजना मतांचा जुगाड’

Maharashtra Assembly Election 2024 । राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतील भाजपने नुकतीच पहिली 99 उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीत बऱ्यापैकी जुन्या नेतेमंडळींना कायम ठेवण्यात आले आहे. तर काही इच्छुक उमेदवारांचे तिकीट कापल्या गेले आहे. त्यामुळे आता तिकट कापल्या गेलेल्या नेत्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
जाहीर केलेल्या पहिल्या यादीत कामठी विधानसभा मतदार संघातून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना तिकीट जाहीर केले आहे. त्यामुळे या जागेवरून भाजप आमदार टेकचंद सावरकर यांचं तिकीट कापल गेलं आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेबाबत केलेल्या विधानानंतर त्यांचं तिकीट कापलं गेल्याची चर्चा आता रंगली आहे.
भाजप नेते टेकचंद सावरकर यांनी काही दिवसांपूर्वी लाडकी बहीण योजनेला मतांचा जुगाड म्हटले होते. या विधानावरून त्यांच्यावर टीका करण्यात आली असून यामुळे त्यांचे तिकट कापले गेले अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या चर्चांवर आता माध्यमांशी बोलतांना सावरकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले,’मी जे बरोबर होतं, तेच बोललोय मी काहीही चुकीचे बोललोय का?..’ असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. ज्यांना हे विधान योग्य वाटलं त्यांनी ते अॅक्सेप्ट करा, ज्यांना चुकीच वाटलं त्यांनी सोडून द्या,असा सल्ला सावरकरांनी दिला आहे. त्यांनी असं म्हणत आपल्या विधानाची पाठराखण केली.
भाजपने कामठी विधानसभेची जागा चंद्रशेखर बावनकुळे यांना दिली आहे. त्यावर माझा कोणताही विरोध नाही. आम्ही पक्षाने जो निर्णय घेतला आहे, त्याचे समर्थन करतो. आणि बावनकुळेंसाठी आम्ही रात्रंदिवस काम करू, असे बावनकुळेंनी म्हटले आहे. आम्हाला पक्षाने याबाबतची कोणतीही पुर्वकल्पना दिली नव्हती. आणि पक्षाने आम्हाला आमची पुढची भूमिका देखील सांगितली नाही. पण मी भापजचे काम करेन आणि माझ्या कार्यकर्त्यांना देखील भाजपचे काम करण्याचे आवाहन करेन, असे सावरकरांनी सांगितले आहे.
तत्पूर्वी टेकचंद सावरकर यांच्या सभेतील व्हिडिओ काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत टीका केली होते. अखेर महायुतीची भानगड पुढे आली! महायुतीला मतांचा दुष्काळ आहे, म्हणून लाडकी बहीण योजना मतांसाठी केलेला जुगाड आहे. भाजपच्या या आमदाराने मान्य केलं की महायुतीतील सर्व नेते खोटं बोलतात. लाडकी बहिण योजना माता भगिनींना लाभ देण्यासाठी नव्हे तर मत पेटीतून लाभ घेण्यासाठी आहे. असं म्हणत त्यांनी टीका केली होती.




