Solapur News : एककाळ असा होती की ज्या मराठवाडा आणि विदर्भात पाण्याच भीषण संकट उभं ठाकलं होतं. त्याच ठिकाणी आता ‘महाप्रलय’ आला आहे. निसर्गाच्या प्रकोपाच्या झळा या दोन्ही भागांतील गावं सोसताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून या भागात जोरदार पाऊस सुरू आहे. याशिवाय सोलापूर जिल्ह्यालाही पावासाचा जोरदार फटका बसला आहे. नागरिकांच्या घरात पाणी शिरलं असून संसार उघड्यावर पडला आहे. घरात पाणीच पाणी झालं आहे. सगळ एका क्षणात संपलं आहे. बळीराज्याच्या डोळ्यातलं पाणी थांबत नाहिये….ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी येथील शेतकरी राजा करत आहे. पण ओला दुष्काळ राज्य सरकारने जाहीर केला नसून सरकार सर्वतोपरी मदत करणार असल्याचं जाहीर केलं आहे. सोलापूरमधील घटना या भीषण संकटांत अनेकांच्या कहाण्या भयावह स्वरुपाच्या आहेत. अशीच एक आजोबा आहेत, ज्यांची तब्बल १६ तासानंतर सुखरुप सुटका करण्यात आली आहे. काल दि. २३ सप्टेंबर रोजी सकाळी साधारण आठच्या सुमारास आजोबा घराबाहेर पडले, ते परतले नाहीच. त्यानंतर तब्बल १६ तासानंतर त्यांचा पत्ता लागला. सोलापूर जिल्ह्यात असणाऱ्या एका गावात ही घटना घडली आहे. सीना नदीला पूर सीना नदीला पूर आल्याने पूराचे पाणी आसपास असणाऱ्या गावात शिरले आहे. पूराचं पाणी इतकं वाढलं की आजोबांनी थेट झाडाचा आसरा घेतला. ते थेट लिंबाच्या झाडावर चढले. त्यानंतर त्यांच्या खाली चहूबाजूंनी पाण्याचा वेढा होता. त्यांचा आवाजही दूरवर जात नव्हता. अशातच गावातील तरुणांनी त्यांना शोधून काढलं आणि याबाबतची माहिती सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना मिळाली. तरुणांनी तत्परता दाखवत…. त्यानंतर लागलीच जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत बचाव पथकाला माहिती दिल्यानंतर या आजोबांची तब्बल १६ तासानंतर सुखरुप सुटका करण्यात त्यांना यश आलं. या आजोबांचं नाव भीरू नामदेव धरणे असं आहे. ज्यावेळी ते झाडावर चढले त्यांच्याकडे कोणताही फोन नव्हता, त्यामुळे संपर्क साधण्याचं प्रश्न नाही. तरीही गावातील तरुणांनी तत्परता दाखवत त्यांना शोधून काढलं आणि हे आजोबा बचावले आहेत. अन्यथा त्यांचा शोध लागलाच नसता तर…. हेही वाचा : अमेरिकेत हनुमानाच्या मूर्तीवरून वाद निर्माण करणाऱ्यांनी ओबामांकडून ‘हे’ शिकावं