महाकुंभातील चेंगराचेंगरीवर रामभद्राचार्य यांचे आखाड्यांना मोठे आवाहन ; भाविकांना म्हणाले,”संगमात स्नान करण्याचा आग्रह सोडा”

Mahakumbh Stampede । उत्तर प्रदेशातील प्रयागराज महाकुंभात बुधवारी मध्यरात्री उशिरा झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर, वैष्णव पंथाचे ज्येष्ठ जगद्गुरु श्री रामभद्राचार्य यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी यावेळी भाविकांना आवाहन करत “महाकुंभात येणाऱ्या सर्व भाविकांना मी विनंती करतो की आज क्षमतेपेक्षा जास्त गर्दी प्रयागराजमध्ये पोहोचली आहे. म्हणून संगमात स्नान करण्याचा आग्रह सोडून द्या आणि जवळच्या घाटांवर स्नान करा. आत्ताच टेन्ट सोडू नका.” कृपया बाहेर जाऊ नका आणि स्वतःची आणि इतरांची काळजी घ्या.” असे आवाहन त्यांनी केले आहे.
रामभद्राचार्य पुढे म्हणाले, “वैष्णव पंथाचे एक ज्येष्ठ धार्मिक नेते असल्याने, मी तिन्ही आखाड्यांना मौनी अमावस्येच्या निमित्ताने आजचे अमृत स्नान रद्द करण्याचे आवाहन करतो. मी देवाला प्रार्थना करतो की सर्वांना आशीर्वाद मिळोत आणि सर्वांचे सुरक्षित राहो. राहा.”
चेंगराचेंगरीमुळे अमृत स्नान रद्द Mahakumbh Stampede ।
मौनी अमावस्येनिमित्त, मोठ्या संख्येने भाविक प्रयागराज महाकुंभात स्नानासाठी पोहोचले होते. यादरम्यान अचानक चेंगराचेंगरी झाली, ज्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी, आखाड्यांनी अमृत स्नान कार्यक्रम पूर्णपणे रद्द करण्याचा निर्णय घेतला. आता कोणताही आखाडा आज अमृत स्नान करणार नाही आणि सर्व आखाड्यांनीही त्यांच्या मिरवणुका छावण्यांकडे परत बोलावल्या आहेत.
भाविकांना त्यांच्या सुरक्षिततेसाठी दिल्या सूचना Mahakumbh Stampede ।
स्थानिक प्रशासन आणि धार्मिक संघटनांनी भाविकांना संयम राखण्याचा आणि संगमावर जाण्याऐवजी जवळच्या घाटांवर स्नान करण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे कोणताही अनुचित प्रकार टाळता येईल. महाकुंभात येणाऱ्या लोकांच्या सुरक्षिततेचा विचार करून प्रशासन पूर्णपणे सतर्क आहे आणि आवश्यक पावले उचलत आहे.





