Koregaon: कोरेगाव येथे 29 सप्टेंबर रोजी महाकुंभ रोजगार मेळावा, बेरोजगारांनी लाभ घेण्याचे आवाहन
Koregaon कोरेगाव तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास कार्यालयातील धनाजी बागल यांनी केले आहे.

Koregaon: बाजारात उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या संधी स्थानिक तरुणांना मिळवून देण्यासाठी येत्या 29 सप्टेंबर रोजी कोरेगाव येथील दर्पण कॉम्प्युटरमध्ये महाकुंभ रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. कोरेगाव तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास कार्यालयातील धनाजी बागल यांनी केले आहे.
दर्पण काम्प्युटर येथे जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने आयोजित लोकसंवाद-2026 कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी हेमंतकुमार चव्हाण, दर्पण काम्प्युटरचे संस्थापक संतोष नलावडे उपस्थित होते.
या मेळाव्याच्या माध्यमातून स्थानिक तरुणांना विविध क्षेत्रांतील रोजगाराच्या संधी एकाच छताखाली उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. आधुनिक उद्योगजगताला अपेक्षित असलेले कौशल्यपूर्ण मनुष्यबळ आणि रोजगाराच्या शोधात असलेले तरुण यांच्यातील दुवा साधण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जात आहे.





