MahaKumbh 2025: स्टीव्ह जॉब्सची पत्नी लॉरेन महाकुंभमध्ये होणार सहभागी; अब्जाधीशांच्या यादीत जगात 59 वा क्रमांक

MahaKumbh 2025: ऍपलचे सह-संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन जॉब्स महाकुंभ 2025 मध्ये सहभागी होणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 61 वर्षीय लॉरेन 13 जानेवारीला प्रयागराजला पोहोचणार आहेत. येथे 29 जानेवारीपर्यंत त्या निरंजनी आखाड्यातील आचार्य महामंडलेश्वर स्वामी कैलाशानंद यांच्या शिबिरात राहणार आहेत. असे सांगितले जात आहे की स्वामींनी त्यांना त्यांचे गोत्र देखील दिले आणि त्यांचे नाव ‘कमला’ ठेवले आहे. स्टीव्ह जॉब्स यांचे 5 ऑक्टोबर 2011 रोजी निधन झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, लॉरेन जॉब्स या आधीही महाकुंभला आल्या आहेत. त्यांची हिंदू धर्मावर नितांत श्रद्धा आहे. कुंभ व्यतिरिक्त त्यांचे भारतात काही खाजगी कार्यक्रमही आहेत, ज्यात त्या सहभागी होणार आहे. 2020 च्या फोर्ब्स इश्यूमध्ये लॉरेन जॉब्स जगातील अब्जाधीशांच्या यादीत 59 व्या स्थानावर होत्या.
#WATCH | Prayagraj | Speaking on Apple’s co-founder late Steve Jobs’ wife, Laurene Powell Jobs to attend Prayagraj Mahakumbh 2025, Spiritual guru Swami Kailashanand Ji Maharaj says, “She is coming to visit her Guru here. We have named her Kamla and she is like a daughter to us.… pic.twitter.com/fwlY3phfhz
— ANI (@ANI) January 10, 2025
स्वामी कैलाशानंद जी महाराज यांनी त्यांचे गोत्र दिले –
स्वामी कैलाशानंद जी महाराज यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, लॉरेन जॉब्ससह देशातील आणि जगातील अनेक दिग्गज कुंभमध्ये सहभागी होतील, आम्ही सर्वांचे स्वागत करतो. ते म्हणाले की लॉरेन कुंभमध्ये सहभागी होण्यासाठी येत आहे, याशिवाय ती तिच्या गुरूंनाही भेटणार आहे. त्यांनी सांगितले की आम्ही त्यांना आमचे गोत्र देखील दिले आहे आणि त्यांचे नाव ‘कमला’ ठेवले आहे.
लॉरेन करणार ‘कल्पवास’ –
मिळालेल्या माहितीनुसार, लॉरेन महाकुंभ 2025 मध्ये कल्पवास देखील करणार आहे. हिंदू धर्मात कुंभ आणि माघ महिन्यात साधूंसह गृहस्थांसाठी कल्पवासाची परंपरा आहे. या काळात गृहस्थांना काही काळ शिक्षण व दीक्षा दिली जाते. याचे काही नियम आणि धार्मिक श्रद्धा आहेत, ज्यामध्ये तपश्चर्या, होम आणि दान केले जाते.





