कॉंग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीच्या वतीने राष्ट्रवादीचे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धनंजय महाडिक यांनी अत्यंत साधेपणाने शक्तिप्रदर्शन न करता उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
खासदार धनंजय महाडिक यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ, आमदार संध्यादेवी कुपेकर, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे, माजी आमदार पी. एन. पाटील, माजी आमदार के.पी. पाटील, धनंजय महाडिक यांच्या पत्नी अरुंधती महाडिक उपस्थित होते. मात्र कॉंग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील अनुपस्थित होते. सतेज पाटील अनुपस्थित राहिल्याने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात चर्चा होती. या अनुपस्थितीमुळे आगामी काळात या महाडिक- पाटील दुरावा हा वाढणार असल्याचे चित्र पाहायला मिळते आहे.