प्रभात वृत्तसेवा महाबळेश्वर – महाराष्ट्राचे नंदनवन तसेच पर्यटकांचे आवडते थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वर सध्या शैक्षणिक सहली तसेच पर्यटकांनी बहरले असून नाताळ व नववर्षाच्या स्वागतासाठी तसेच महाबळेश्वरचे निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांनी चांगलीच गर्दी पहावयास मिळत आहे. मात्र, योग्य वाहतूक व्यवस्थापन नसल्याने तासंनतास पर्यटक व स्थानिकांना ट्रॅफिकमधे अडकून राहावे लागत आहे. वेण्णालेक कर संचलन केंद्र, लिंग मळा फाटा, बाळासाहेब ठाकरे चौक, छत्रपती शिवाजी महाराज, चौक आराम खिंड, माखरिया गार्डन येथे बऱ्याचदा वाहतूक ठप्प होताना दिसून येत आहेनववर्षाच्या स्वागत साठी पर्यटकांना मेजवानी देण्यासाठी महाबळेश्वर पाचगणी तापोळा येथील विविध रिसॉर्ट सज्ज झाले आहेत तर नव वर्षाचा स्वागत साठी महाबळेश्वर पर्यटकांची पहिली पसंती ठरत आहे. वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात पर्यटक हंगाम असताना देखील योग्य वाहतूक व्यवस्थापन नसल्याने तासंतास पर्यटकांना स्थानिकांना ट्रॅफिकमधे अडकून राहावे लागत आहे. वेण्णा लेक कर संचलन केंद्र , लिंग मळा फाटा, बाळासाहेब ठाकरे चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक आराम खिंड माखरिया गार्डन येथे बऱ्याचदा वाहतूक ठप्प होताना दिसून येत आहे. तर नो एन्ट्री, नो पार्किंग तसेच एकरी वाहतूक याची अंमलबजावणी होत नाही. एकेरी वाहतूक आवश्यक याचबरोबर लिंगमळा रस्ता नाकिंदा ते अवकाळी असे पर्यायी मार्ग असून देखील त्याचा योग्य वापर करून घेता येत नसल्याने पाचगणी महाबळेश्वर या मुख्य रस्त्यावर वाहतुकीचे ताण जाणवत आहे. महाबळेश्वर शहरातील विविध चौक महत्त्वाचे रोड येथील वाहतूक व्यवस्थापन व एकेरी वाहतूक व्यवस्थापन याबाबत अंमलबजावणी केल्यास बऱ्याचशा ट्रॅफिक वरचा ताण कमी होणार आहे. वाहतुकीचे नियम पाळण्याची गरज यातच विविध मुख्य रस्त्यांवरबंद अवस्थेतील स्कूलबस इतर गाड्या विशिष्ट ठिकाणी हलवण्यास पार्किंगची बरोबरच वाहतुकीची समस्या सोडवता येणार आहे. भविष्यात एकेरी वाहतुकीचे व्यवस्थापन योग्यरीत्या केल्यास बऱ्याच प्रमाणात ट्रॅफिकची समस्या सोडवण्यात यश येईल. ३१ डिसेंबरसाठी येथील विविध पॉइंट्सवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये या साठी पोलिस प्रशासन तसेच वनविभागाची करडी नजर असणार आहे. मात्र, पर्यटकांकडून वाहतुकीचे नियम पाळले गेल्यास सर्वांनाच सुट्ट्यांचा आनंद घेता येणार आहे.